Hingoli Police: पोलीस दलातर्फे नवदुर्गा सन्मान व महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

2 hours ago 1

हिंगोली (Hingoli Police) : जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील शिवाजी सभागृह येथे आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता नवदुर्गा सन्मान व महिला सुरक्षा जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील , शिक्षा अधिकारी संदीप सोनटक्के, आदरणीय शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश यादळवी, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिला सुरक्षा जनजागृती पर कार्यक्रम माझे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने पथनाट्य करून महिला जनजागृती पर चे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा संदर्भात हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने काही व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आल्या.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल, आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मिराबाई धनराज कदम हिंगोली, जयश्री देवीदास पाटील.वसमत, सत्यभामा सोलाजी शिंदे हिंगोली, ज्योत्सना कुमार वारे मुरूबा ता.वसमत, लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे उमरा ता.हिंगोली, खान गजाला यास्मीन फेरोज ता.कळमनुरी, डॉ.प्रितीताई प्रभाकर दळवी.कळमनुरी, सविता श्रीधर देशमुख हिंगोली या नवदुर्गांचा प्रमाणपत्र, शालश्रीफळ ,सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पोलीस दल, भरोसा सेल यामधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article