हिंगोली (Sakal Matang Samaj) : 11ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे सकल मातंग समाज हिंगोली च्या वतीने डॉ.अमोल धुमाळ यांच्या नेतत्वाखाली सामाजिक न्याय सन्मान रॅली काढण्यात आली. 1 ऑगस्ट 2024 रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण उप वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे असा ऐतिहासिक निर्णय दिल्या मुळे या निर्णयाचे स्वागत करून सामाजिक न्याय सन्मान रॅली साहित्य सम्राट डॉ. अण्णा अण्णाभाऊ साठे पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे काढण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने तात्काळ करा यासाठी माननीय जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला सकल मातंग समाज डॉ.अमोल धुमाळ यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. सन्मान रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, अग्रसेन महाराज या महामानवांना अभिवादन केले. रॅलीचे आयोजन मातंग समाज हिंगोली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.