बॉलिवूड अभिनेत्री इशिका तनेजा हिने वयाच्या 30 व्या वर्षी संन्यास घेतला आहे. तनेजा हिने ‘महाकुंभ’मध्ये अभिनेय सोडून अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री आणी माजी ब्यूटी क्विन इशिका तनेजा 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंदू सरकार’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस ऐआली होता. आता इशिका हिने साध्वी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर चर्चेत आली आहे. अध्यात्म आणि सनातन धर्माच्या प्रचारासाठी स्वत:ला समर्पित करण्यासाठी इशिकाने ग्लॅमर विश्वाला अलविदा केला आहे.
काही सिनेमे आणि अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसलेली इशिका तनेजा हिने शोबिज सोडून ‘साध्वी’ बनून आध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 29 जानेवारी रोजी इशिका मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभ येथे गेली आणि पवित्र स्नान करत अध्यात्म मार्ग स्वीकारल्याची घोषणा केली.
इशिका तनेजा हिने 2018 मध्ये मिस वर्ल्ड टुरिझमचा किताब जिंकला होता. 2016 मध्ये, तिला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 100 महिला अचिव्हर्स ऑफ इंडिया श्रेणीमध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
यापूर्वी जानेवारी महिन्यात इशिकाने मध्य प्रदेशातील जबलपूर येथे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु दीक्षा घेतली होती. इतर महिलांना सनातन जीवन अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन देताना, इशिका म्हणाली की, महिला लहान कपडे घालून नाचण्यासाठी नाहीत, तर त्या सनातनची सेवा करण्यासाठी आहेत…
पुढे इशिका म्हणाली, साध्वी बनणं हा पब्लिसिटी स्टंट असल्याच्या दाव्याचंही तिने खंडन केले. ती आपल्या ‘जुन्या आयुष्यात’ परत येणार नाही असेही तिने सांगितले. ती म्हणाली, “मला संधी मिळाली तर मी सिनेमांची निर्मिती करेन, पण त्यातही सनातन धर्माचा प्रचार करेन.” असं देखील इशिका म्हणाली.
सोशल मीडियावर इशिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे, इशिका हिचे इन्स्टाग्रामवर 1.6M फॉलोअर्स आहेत. तर अभिनेत्री फक्त 997 नेटकऱ्यांना फॉलो करते.