ब्राह्मणांची प्रगती शिक्षणाच्या जोरावर:त्यांनी मागासलेल्यांना हक्क मिळवून दिले, ते ओबीसींचे शत्रू नाहीत- लक्ष्मण हाके

2 hours ago 1
ओबीसीचा शत्रू हा ब्राम्हण नाही. ब्राह्मण आपले उच्च शिक्षणाच्या जोरावर जगाच्या प्रगत देशांमध्ये गेलेला आहे. तो आपल्या हक्कासाठी भांडत बसला नाही तर तो इतरांना आपला हक्क देणारा ब्राह्मणच होता, असे ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. दरम्यान लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले की, आजचा जो महाराष्ट्र आहे तो फक्त काही ठराविक लोकांचा वतनदारांचा आणि दरोडेखोरांचा महाराष्ट्र पहायला मिळत आहे, असा आरोप हाकेंनी हदगाव तालुक्यातील सभेनंतर बोलताना केला आहे. नेमके हाकेंचे वक्तव्य काय? प्रा. लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले की, ओबीसीचा खरा शत्रू ब्राम्हण नाही.ओबीसीचा खरा शत्रू महाराष्ट्र लाटणारा आमदार, खासदार, वतनदार, दरोडेखोर,यांची टोळी आहे. ब्राम्हण हा आज शिक्षणाच्या जोरावर प्रत्येक प्रगत देशामध्ये गेला. तो इथे भांडत बसला नाही. जो मागासलेला होता, त्याला त्याचा हक्क मिळवून देणारा हा ब्राम्हणच होता. पण, आजचा जो महाराष्ट्र बघायला मिळतोय, फक्त काही ठराविक लोकांचा वतनदारांचा आणि दरोडेखोरांचा महाराष्ट्र पहायला मिळत आहे निवडणुकीत पडणाऱ्यांची यादी आमच्याकडे तयार शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे सर्वपक्षीय नेते जरांगे पाटील यांना पाठींबा देतात हे दुर्दैव आहे, या सगळ्यांविरोधात उमेदवार उभे करणार अशी प्रतिक्रिया ओबिसीचे आंदोलक आणि नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिली. देगलूर येथे आयोजित मेळाव्यासाठी हाके आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात मोलगाई आहे? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी नाशिकमधील डॉक्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, महाराष्ट्रात मोलगाई आहे की काय अशी परिस्थिती या घटनेतून दिसून येते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article