भगवान चायरेची मॅरेथॉन स्पर्धेत गगनभरारी; पोलिसांकडून सन्मान:नेपाळ येथील 400 मीटर मॅरेथॉन स्पर्धेत केले प्रतिनिधित्व
2 hours ago
1
घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील भगवान चायरे या २४ वर्षीय युवकाने नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ४०० मीटर धाव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत विजयी होत सुवर्णपदक प्राप्त करून घाटंजी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याची दखल तालुक्यातील कुठल्याही सामाजिक किंवा राजकीय व्यक्तीने घेतली नाही. याबद्दल कुतूहल व्यक्त होत असतांनाच घाटंजीचे ठाणेदार निलेश सुरडकर व प्रशासनाने सोमवार दि. २० जानेवारीला त्याला पोलिस ठाण्यात बोलावून सन्मानित करण्यात आले. या युवकाने प्रथमच आर्णी येथील मॅरेथॉन ५ किलोमीटर धाव स्पर्धेपासून सुरुवात केली. यानंतर वाशीम येथे जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत युपी फेडरेशनचे प्रशिक्षक आनंद यादव यांनी या धावपटुला वाव देत नेपाळमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत २०२२ मध्ये व २०२५ मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी तो पटणा, हरियाणा, बिलासपूर, तामिळनाडू, चेन्नई, भुटान, नागपूर अशा एकूण तब्बल ९८ स्पर्धेत सहभागी झाला होता. विशेष बाब म्हणजे या होतकरू युवकांची दखल आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाने घेतली नाही. घाटंजीचे ठाणेदार निलेश सुरडकर व प्रशासनाने सोमवारी दि. २० जानेवारीला त्याला पोलिस ठाण्यात बोलावून सन्मानित केले. यावेळी पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर, पोलिस उपनिरीक्षक राजेश पंडित, विनोद मेश्राम, सुशील शर्मा, अशोक मडावी, अमोल कोवे, राहुल खंडागळे, दिनेश जाधव, डाखोरे जमादार, प्रविण तालकोकुलवार, दिपक वाकोडे, निलेश छापेकर, अमीत लोखंडे, बनसोड, रत्नाकर सलामे, गजानन पातोडेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)