भरधाव जाणाऱ्या बोलेरो पीकअपची दुचाकीला धडक:जुना बायपास रोडवरील घटना; गंभीर जखमी आई व मुलावर उपचार सुरु

2 hours ago 1
भरधाव जाणाऱ्या बोलेरो पीकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आई व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना जुना बायपास रोडवरील प्रताप ढाब्यासमोर ४ ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. येथील रहिवासी शारदा अनिल कुटे वय ५५ व त्यांचा मुलगा प्रशांत अनिल कुटे वय ३२ हे मायलेक एमएच २८ बीएच ४९०१ या क्रमांकाच्या दुचाकीने जनुना येथील रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी जात होते. प्रताप ढाब्यासमोर येताच त्यांच्या दुचाकीला समोरुन भरधाव येणाऱ्या एमएच २१ बीएच ५२१० या क्रमांकाच्या बोलेरा पीकअपने धडक दिली. या अपघातात अनिल कुटे यांच्या पाय व डोक्याला गंभीर जखम झाली आहे. तर त्याच्या आईला देखील गंभीर मार लागला आहे. जमखी दोन्ही मायलेकांना उपचारासाठी उर्वरित , पान ४ वर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article