जे आपल्या कामावर निवडून येत नाहीत, ते जातीच्या ढाली पुढे करून जातीवादाचे विषय पेरत आहेत. काँग्रेसने मुस्लिम आणि दलित वर्गाला भारतीय जनता पक्षाची भीती घालण्याचे काम करून जातिवाद पसरवला. ही निवडणूक आमदार मोनिका राजळे यांचे भविष्य घडवणारी नसून या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न आणि भविष्य घडवणारी आहे. या निवडणुकीत आमदार राजळे यांना भरघोस मताने निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
यावेळी आमदार मोनिका राजळे, भैय्या गंधे,बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, भीमराव फुंदे, धनंजय बडे, गंगाखेडकर, नितीन दहिवाळ, भगवान बांगर, अशोक चोरमले, आशुतोष डहाळे, नारायण पालवे, दिनेश लव्हाट, अशोक आहुजा, बापू धनवडे, बाबा राजगुरू आदी उपस्थित होते.