भाजपच्या श्रेयवादामुळे कुंभमध्ये लोकांनी प्राण गमावले, संजय राऊत यांचा आरोप

1 day ago 1

भाजपने आम्हीच हिंदुत्ववादी, आम्हीच कुंभ आयोजन करू शकतो असा श्रेयवाद केला आणि लोकांना प्राण गमवावे लागले असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच अमित शहा, राजनाथ सिंह सारखे व्हीव्हीआयपी लोक तिथे जातात तेव्हा घाट सर्वसामाान्य लोकांसाठी बंद केला जातो त्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण होते असेही संजय राऊत म्हणाले

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्याचं राजकीय मार्केटिंग केलं. त्यात चुकीचं काही नाही. पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही. ज्याची श्रद्धा आहे, आस्था आहे, ते वर्षानुवर्ष कुंभला जातात. दररोज कोट्यवधी लोक आल्याची आकडेवारी दिली जात आहे. सामान्य माणसांना 10-15 किमी चालत जावं लागत आहे. तिथल्या व्यवस्थेवर लोक खुष नाही हे आम्ही पाहिलं. शेवटी आज दुर्दैवाने चेंगरा चेंगरी झाली. माणसं तुडवली गेली. शेकडो लोक जखमी आहे. 10 पेक्षा जास्त भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. स्वतः केंद्रीय गृहमंत्री तिथे येऊन स्नान करून गेले. तेव्हा तो घाट बंद करण्यात आला आणि त्यामुळे लोकांची अव्यवस्था झाली. संरक्षणमंत्री आले तेव्हा हा घाट सील करण्यात आला. जेव्हा जेव्हा व्हीआयपी कुंभमेळ्यात जातात तेव्हा तेव्हा एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ तो घाट बंद केला जातो, त्याचाही हा परिणाम असतो. लोकही बाहेर तुंबलेले असतात. या सगळ्यांचा परिणाम पाहता मी एकच सांगेन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी पक्षाच्या मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा लाखो भाविकांच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर लक्ष द्यावे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच आज 10 पेक्षा जास्त भाविकांचे प्राण गेले आणि त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या, पंतप्रधान, गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय ? ज्यांनी प्राण गमावले ते परत येणार आहेत का? अनेक लोक, अनेक महिला रस्त्यावर झोपले आहेत मग सरकारने काय व्यवस्था केली आहे? 1954 साली तिथे कुंभ झाला त्याची व्यवस्था पाहा. या कुंभची व्यवस्था कशी आहे हे पाहण्यासाठी पंतप्रधान नेहरी यांनी कुंभचा दौरा केला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत तिथे पूर्णवेळ उपस्थित होते अशी माझी माहिती आहे. आणि त्यांचे राजकीय भांडवल करण्यासाठी त्यांनी कुंभ आयोजित केला नव्हता. त्यांनी धर्मशास्त्रानुसार लोकांना सुविधा मिळाव्यात म्हणून कुंभचे आयोजन केले होते. अखिलेश यादव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जी व्यवस्था झाली ती उत्तम होती असे श्रद्धाळू सांगतात. यावेळी कुंभ व्यवस्थापनात इतर पक्षांनाही सामील करून घेतलं असतं, त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला असता तर ही वेळ आली नसती. पण आम्हीच हिंदुत्ववादी, आम्हीच कुंभ आयोजन करू शकतो हा श्रेयवाद करताना लोकांना प्राण गमवावे लागले असेही सजय राऊत यांनी सांगितले.

कुंभसाठी 10 हजार कोटींपेक्षा जास्त बजेट होतं. हे 10 हजार कोटी प्रत्यक्ष दिसत नाहिये. तुम्ही महाराष्ट्रात, मुंबईत कोव्हिड काळात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 10 हजार कोटी रुपये व्यवस्थित खर्च झाले असते तर ही घटना घडली नसती. आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल झाला पाहिजे? यासाठी मुलुंडच्या पोपटलालने तिथे जाऊन प्रश्न विचारला पाहिजे असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article