भाजपसोबत युती आहे, लग्न नाही:छगन भुजबळ यांचे विधान; ओबीसींसाठी दोनदा मुख्यमंत्रिपदाची संधी सोडल्याचा दावा

3 hours ago 1
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या युवा संसदेत झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सध्या राष्ट्रवादी पक्षाची भाजपसोबत केवळ युती आहे, लग्न नाही. भुजबळ यांनी आपल्या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या निर्णयांबद्दल मोकळेपणाने बोलताना सांगितले की, शिवसेनेत असताना आणि नंतर काँग्रेसमध्ये असताना त्यांना दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, ओबीसी समाजाच्या हितासाठी त्यांनी या संधी सोडून दिल्या. विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेमुळेच एका सामान्य भाजी विक्रेत्याला उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली, असेही त्यांनी नमूद केले. तेलगी प्रकरणावरून त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. या प्रकरणात कोणतेही आरोप सिद्ध न होताही शरद पवार यांनी आपला राजीनामा घेण्याची घाई केल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर मंत्रिपद न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाकडून मतदानावर परिणाम झाल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र, ओबीसींच्या हक्कांसाठी लढण्याची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कोणीही आपला वापर करू शकत नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article