Published on
:
24 Nov 2024, 11:31 pm
Updated on
:
24 Nov 2024, 11:31 pm
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान आवताडे व काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात लढत झाली. दोघांनाही एक लाखापेक्षा जास्त मते घेतली. यात आवताडे हे विजयी ठरले. आवताडे यांना मंगळवेढा शहर व 35 गावांनी तारले तर भालके यांना दूर केले. मात्र, पंढरपूर तालुक्यातील 22 गावांनी भालके यांनाच तारल्याचे आणि आवताडे यांना दूर केल्याचे दिसून आले. पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील 22 गावातून ज्यांना मताधिक्य मिळेल, तो विजयाचा दावेदार ठरेल, अशी चर्चा रंगली होती. त्याप्रमाणे भालके यांनी मताधिक्य घेतले. आणि मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील 35 गावे भालके यांना मानणारी असणारी आहेत.
मात्र, या 35 गावातून भालके ऐवजी आवताडे यांचा करिष्मा चालला आहे. त्यामुळे भालके यांनी 35 गावांच्या मतांच्या बेरजेवर केलेल्या विजयाचा दावा फोल ठरला गेला आहे. उलट पक्षी 35 गावांनी गत निवडणुकीत आवताडे यांना दूर केले होते. त्यांनी या निवडणुकीत आघाडी घेत जनाधार मिळवला आहे, तर पंढरपूर तालुक्यातील 22 गावातून आवताडे यांना जादाची आघाडी मिळेल, असे चित्र रंगवले जात होते. कारण या भागात प्रशांत परिचारक यांना मानणार मतदार जादा आहे. असे असताना देखील पहिली फेरी वगळता या गावांमधून आवताडे यांना कमी मताधिक्य मिळाले आहे. परिचारक यांच्या खर्डी गावातून आवताडे यांना मताधिक्य मिळाले नाही. भालके यांना मताधिक्य मिळाले. तर बोहाळी येथे भाजपचा तालुकाध्यक्ष असताना देखील काँगे्रसच्या भालके यांना जादाचे मताधिक्य मिळाले आहे.
भाजपे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पंढरपूर मंगळवेढ्यात मोठा प्रभाव आहे. त्यांचा मतदारही जास्त आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातून आवताडे यांना भालके यांच्यापेक्षा जास्त मते मिळालेली आहेत. तर मंगळवेढा शहर व तालुक्यात देखील आवताडे यांना मताधिक्य मिळण्यास मदत झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.