प्रचार करताना भगिनी भाग्यश्री, राजश्री व धनश्री भालके.Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 11:38 pm
Updated on
:
17 Nov 2024, 11:38 pm
मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शनिवारी मंगळवेढा येथील भीमनगर व साठेनगर परिसरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी घरोघरी जात प्रचार केला. यामध्ये भगीरथ भालके यांच्या भगिनी सक्रियपणे सहभागी होत्या. यामुळे या परिसरामध्ये त्यांना पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
मंगळवेढा शहरातील भीमनगर व साठेनगर या भागात होम टू होम प्रचार पदयात्रा करण्यात आली. या पदयात्रेमध्ये भगीरथ भालके यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांच्या भगिनी भाग्यश्री, राजश्री व धनश्री भालके यांनी केले. या भागातील महिलांना उमेदवाराचा बॅलेटचा अनुक्रमांक व चिन्ह याबाबत जनजागृती केली. तसेच या पदयात्रेच्या निमित्ताने उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी भाग्यश्री भालके म्हणाल्या की, स्व. भारतनाना यांनी त्यांच्या आमदारकी काळात गोरगरिबांना मदतीला धावून जाण्याची शिकवण आम्हाला दिली आहे. ती आम्ही कायम पाळत आहोत. जेव्हा केव्हा सुखदुःख असते. तेव्हा भालके कुटुंब कुठेही कमी पडत नाही. सदैव लोकांसोबत असते, म्हणून सर्वसामान्य जनता हीच आमची ताकद आहे.
आपण कायम आमच्या पाठिशी आहात. असेच सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी प्रकाश खंदारे यांनी सांगितले की, स्व. भारत भालके यांनी अडचणीच्या काळात नेहमी आम्हाला आधार दिला आहे. ही निवडणूक विचारांची लढाई असून समाजाने नेहमी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सहकार्य केले आहे.