वडशिंगे येथे सभेप्रसंगी आ. बबनराव शिंदे, प्रा.शिवाजीराव सावंत, उमेदवार रणजित शिंदे आदी. Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 12:23 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:23 am
माढा : खैराव-मानेगाव उपसासिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी आणि भीमा व सीना नदीवर ठिकठिकाणी मोठे बॅरेजेस बांधण्यासाठी आमदारकीची संधी द्यावी, असे आवाहन माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांनी मतदारांना केले आहे.ते वडशिंगे येथे प्रचारार्थ सभेत बोलत होते.
रणजित शिंदे पुढे म्हणाले, मागील 30 ते 35 वर्षांत आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मी अपक्ष निवडणूक लढवित आहे. मतदारसंघात भीमा-सीना जोड कालवा,सीना-माढा उपसासिंचन योजना कार्यान्वित केली,बार्शी उपसासिंचन योजनेतून माढा तालुक्यातील चार गावांना पाणी,साखर कारखाने उभे करून सातत्याने एफआरपी पेक्षा जास्त दर उसाला दिल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत म्हणालेे की,अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिल्यापासून विरोधक हतबल व अस्वस्थ झाले आहेत.
विरोधकांकडे कोणतीच विकासाची द़ृष्टी नाही
यावेळी आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की,विरोधी उमेदवारांकडे विकासाची कसलीही द़ृष्टी नाही.नुसती भ्रामक व नकारात्मक टीका करुन मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.सध्या ते खोटेनाटे बोलून सर्वसामान्य जनता व शेतकर्यांची फसवणूक व दिशाभूल करीत आहेत.