कपाशीवर अळ्यांचा प्रादुर्भाव; रात्री करावी लागते फवारणी:कपाशीच्या झाडावर 50 ते 60 अळ्यांचा प्रादुर्भाव

2 hours ago 1
अकोट तालुक्यात यंदा जास्त पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून शेतकरी सावरत असतानाच कापूस वेचणीकडे वळला आहे. मात्र आता थंडी जाणवू लागण्यासोबतच धुकेदेखील पडू लागले आहे. यामुळे कपाशीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. या अळ्या पाने व कपाशीच्या झाडावरील कैरी नष्ट करत आहेत. कपाशीच्या प्रत्येक झाडावर ५० ते ६० अळ्यांचा प्रादुर्भाव अकोट तालुक्यात चोहोट्टा बाजार व कुटासा महसूल मंडळातील गावांमध्ये दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या चोहोट्टा बाजार व कुटासा महसूल मंडळातील कपाशी पिकावर अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव आहे. रात्रीच्या वेळी अळ्या पानाच्या खालच्या बाजूने दडून बसलेल्या असल्याने या अळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कपाशी पिकावर फवारणी करावी लागत आहे. फवारणीचा मोठा खर्च करूनही कपाशी पिकावरील अळ्यांचा प्रादुर्भाव होताना दिसत नाही. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, येथील शेतकरी कपाशीवरील अळ्या मोजतानाचे काही व्हिडिआेदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ^ स्पोडोप्टेरा लिट्युरा या अळीचा उद्रेक झाला असून, शेतकऱ्यांनी तातडीने कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून या अळीचा प्रादुर्भाव थांबवता येणे शक्य आहे. कोलारू प्लास्ट ५० टक्के, सायपर मित्र पाच टक्के, २० मिली पाणी व डेलिगेट यांचा सुद्धा शेतकऱ्यांनी वापर करावा. - पी. पी. पाटील, कापूस कीटकनाशक शास्त्रज्ञ, डॉ.पं.दे.कृ.वि. ^ तरोडा शिवारात तंबाखू खाणाऱ्या अळीचे आक्रमण झाले आहे. महागडे कीटकनाशक फवारणी केली पण परिणाम दिसून येत नाही. - रवी वानखडे, शेतकरी, तरोडा. अळीमुळे उत्पादनात येणार घट ^दोन महिन्यांपूर्वी या परिसरात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. भरमसाठ पैसा खर्च करून कपाशी पीक वाचवले. अजून घरात कापसाचे बोंडही आले नाही. मात्र, कपाशी पिकावर तंबाखू खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. - मंगेश तांडे, शेतकरी, टाकळी खुर्द. नुकसान भरपाई मिळावी ^आमच्या परिसरात कपाशी पिकावर खूप मोठ्या प्रमाणात तंबाखू खाणाऱ्या अळीचे आक्रमण झाले आहे. शेतकऱ्यांना कृषी विभाग कडून मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. - मंगला पुंडकर, शेतकरी, करतवाडी रेल्वे. तातडीने फवारणी करणे गरजेचे फवारणीचा परिणाम नाही

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article