Uddhav Thackeray (उद्धव ठाकरे) Member of the Maharashtra Legislative CouncilPudhari News Netwrok
Published on
:
16 Nov 2024, 4:52 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:52 am
मालेगाव : गटप्रमुखाने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली व सरकार स्थापन केले. या सरकारने जनतेची विश्वासार्हता गमावली आहे. निवडणुकीत बाळासाहेबांचा फोटो न वापरता आपल्या वडिलांचे फोटो वापरा व जनतेसमोर जा तुम्हाला तुमची लायकी समजेल, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील प्रचार सभेत केले.
ठाकरे म्हणाले, ज्या चाळीस जणांनी पक्ष फोडला, चिन्ह चोरले, वडील चोरले अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवणार असून, उबाठा गटाचे उमेदवार आजच निवडून आलेले आहेत फक्त काही दिवसांत घोषित होतील. पालकमंत्री भुसे यांच्यावर टीका करत विकासकांमावर आरोप केले. हिरे कुटुंबासह शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या कांदा, सोयाबीनच्या निर्यातबंदीमुळे हमीभाव मिळत नाही. कामगार व युवकांवर झालेला अन्याय तसेच कांदा उत्पादक शेतकरीविरोधी धोरणांवर त्यांनी टीका केली. या सरकारने शेतकर्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम केल्याचे सांगत बहिणींंच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न उपस्थित केला.