फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का?:त्यांना उपचाराची गरज; धर्मयुद्धाच्या मुद्यावरुन संजय राऊत यांची आगपाखड

1 hour ago 1
जनतेला मतदानाचा अधिकार आहे. ते आपले मत त्यांना वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात. मात्र भारतीय जनता पक्षाला संविधानाला बदलायचे आहे. त्यामुळे ते मतदानांवर दबाव आणत आहेत. गोंधळ निर्माण करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे धर्मयुद्ध असल्याचे म्हणत आहेत. मात्र हे धर्मयुद्ध कोणत्या धर्माचे असेल तर महाराष्ट्र धर्माचे असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी हे आमचे धर्मयुद्ध असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का? आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकवू असा दावा ते करत आहेत. पाकिस्तानवर तिरंगा फडकवायचे तर राहू द्या. आधी पाक व्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवून दाखवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांना आव्हान दिले आहे. हिम्मत असेल तर मणिपूरला जाऊन, इंफाळला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा, असा आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे. लडाखच्या पुढे चीन घुसला आहे. त्या ठिकाणी जाऊन चीन व्याप्त भूमीवर जाऊन तिरंगा फडकवून दाखवा, असे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे. तुम्हाला मते मिळत नाही, एखाद्या जातीचे, पंथाचे किंवा धर्माचे लोक तुम्हाला मतदान करत नाहीत, त्यामुळे तुम्ही व्होट जिहाद सारखे मुद्दे काढत असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. कोणाला मत द्यायचा हा जनतेचा प्रश्न आहे. 2014 मध्ये मुस्लिम समाजाने नरेंद्र मोदी यांना मतदान केले. मग त्याला देखील व्होट जिहाद म्हणायचे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांना उपचार घेण्याची आवश्यकता देवेंद्र फडणवीस यांना 23 तारखेनंतर मानसिक आजार जडतील, याची आम्हाला चिंता वाटते. त्यांना आता उपचाराची गरज असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांना प्रत्युत्तर महाराष्ट्रामध्ये कोणीही झोपलेले नाही. महाराष्ट्रात जागा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रने तुम्हाला लोकसभा निवडणुकीत झोपवले, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. जोपर्यंत महाराष्ट्र जागा आहे, तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्र इंग्रजांप्रमाणे लुटता येणार नाही. आम्ही जागे नसतो तर अर्धा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने अदानीच्या नावावर करून टाकला असता, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. निवडणुका आल्यावरच धर्म आठवतो ही विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या धर्मामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सारखे लोक नाहीत. त्यांचा तर एकच धर्म आहे तो म्हणजे हिंदू - मुसलमान. निवडणुकांची वेळ आल्यानंतरच त्यांना हिंदू मुस्लिम धर्माच्या गोष्टी आठवत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ठाकरेंनी आवाज उठवला म्हणून तपासणी उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवल्यानंतरच अमित शहा आणि इतर नेत्यांच्या बॅगा चेक झाल्या असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आवाज उठल्यानंतरच निवडणूक आयोगाला जाग आली. त्यांनतरच इतरही नेत्यांच्या बॅगा चेक झाल्या. पोलिस आणि आयोग सरकारच्या सांगण्याप्रमाणेच काम करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article