Hingoli: विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

2 hours ago 1

हिंगोली (Hingoli):- शहरातील जि.प.मैदाना समोर खासगी कोचींग क्लासेसमध्ये शिकवण्यासाठी गेलेल्या किरण गजानन लोंढे (१६) या विद्यार्थ्याने १३ नोव्हेंबरला रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या केली होती.

रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या

आत्महत्येपूर्वी(suicide) त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यामध्ये कोचींग क्लासेसच्या दोन शिक्षकासह तिघांनी फसविल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये नमूद केले होते. त्यावरून १५ नोव्हेंबर रोजी हिंगोली शहर पोलिसात गजानन लोंढे यांनी रितसर तक्रार दिली. त्यात मृतक किरणला क्लासेस मधील मुली सोबत आमचे शारीरिक संबंध(physical relationship) आहे असे तू क्लासेस मधील दुसऱ्या मुलांना का सांगितले आमची व मुलींची बदनामी का केली, या कारणावरून वारंवार शिवीगाळ करून धमक्या देऊन त्रास दिल्याने किरणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने कोचींग क्लासेसच्या सतिष थोरात रा.गढाळा, अनिल वानखेडे रा.लाख, ज्ञानेश्वर गिरी रा.म्हाळसगाव या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव हे करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article