Published on
:
16 Nov 2024, 8:55 am
Updated on
:
16 Nov 2024, 8:55 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री नयनताराने साऊथ स्टार धनुषवर टीका केली आहे. धनुषला माझ्याशी व्यक्तीगतरित्या तक्रार आहे आणि आम्ही धनुषच्या व्यवहारामुळे त्रस्त झालो, असे नयनताराने म्हटले आहे. नयनताराने सार्वजनिकपणे आरोप केले आहेत की, नयनतारा-विग्नेशच्या लग्नाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये धनुषने त्याच्या चित्रपटाच्या गाण्याचा वापर करण्यापासून रोखले. लग्नाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये गाणे लावण्यास परवानगी दिली नाही
'लेडी सुपरस्टार' अभिनेत्री नयनताराने दिग्दर्शक विग्नेश सिवनशी विवाह केला. नयनतारा आणि विग्नेश सिवन यांची ओळख विजय सेतुपती स्टारर चित्रपट "नानम राउडी थान" च्या माध्यमातून झाली होती. त्यांनी २०२२ मध्ये लग्न केले. फॅन्स त्यांच्या लग्नाची डॉक्युमेंट्री रिलीज होण्याची प्रतीक्षा करत आहेत. २ वर्षांनंतरही त्यांची लग्नाची डॉक्युमेंट्री रिलीज झालेली नाही. नयनतारा-विग्नेश सिवन यांच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये निर्माता, अभिनेता धनुषच्या 'नानम राउडीथन' चित्रपटातील गाणे वापरम्यासाठी परवानगी मागितली होती. हेच कारण असावं म्हणून ती डॉक्युमेंट्री अद्यापपर्यंत रिलीज करण्यात आलेली नाही. या प्रकरणी नयनताराने सार्वजनिकपणे धनुषवर आरोप केले आहेत. नयनताराने खुले पत्र लिहून म्हटले आहे, “प्रिय धनुष के राजा, पुत्र कस्तूरी राजा, पुत्र सेल्वारागवन.
ती म्हणते, हे पत्र मी अनेक चुका सुधारण्यासाठी लिहिलं आहे. वडील कस्तूरी राजा यांच्या सहकार्याने, भाऊ सेल्वारागवन, महान दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही फिल्म उद्योगात एक प्रसिद्ध अभिनेता बनला आहात. सिनेमामध्ये कोणत्याही बॅकग्राऊंडशिवाय एक व्यक्ती आव्हानात्मक फिल्म उद्योगात आला आणि प्रचंड मेहनत, खऱ्या समर्पणाच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचला आहे. माझे प्रशंसक जे माझ्यावर प्रेम करतात, आणि शुभचिंतक नयनतारा बियॉन्ड द फेयरी टेल डॉक्युमेंट्रीची प्रतीक्षा करत आहेत. ती नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. प्रशंसकांसाठी सर्व लोकांनी वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणी पार करत सर्व कामे पूण४ केली असून आता डॉक्युमेंट्री रिलीजसाठी तयार आहे.