हिवाळ्यात मधुमेहावर ‘ही’ फळे, भाज्या गुणकारी.Pudhari File Photo
Published on
:
16 Nov 2024, 11:37 am
Updated on
:
16 Nov 2024, 11:37 am
नवी दिल्ली : थंडीची सुरुवात झाली आहे. गोडगुलाबी थंडी कितीही हवीहवीशी वाटत असली, तरीदेखील वातावरणात गारवा जाणवायला लागल्यानंतर तब्येतीच्या कुरबुरी जाणवायला लागतात. या दिवसांत मधुमेहाच्या रुग्णांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या दिवसांत बाजारात पोषक तत्त्वांनी युक्त असलेले फळं आणि भाज्या मिळतात. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा ॠतू खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण खाण्या-पिण्याच्या योग्य सवयींमुळे तुम्ही रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात ठेवू शकता, असे तज्ज्ञ सांगतात.
हिवाळ्याच्या दिवसात फळ आणि भाज्या पोषण तर पुरवतातच; पण ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर असतात. पेरू, संत्री आणि पालकसारखे खाद्यपदार्थ तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करा. त्याचबरोबर नियमित ब्लड शुगर लेव्हलदेखील तपासत पाहा. पेरूत फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळं रक्तातील साखर नियंत्रणात राहते. सकाळी नाश्तात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही पेरू खावू शकता. त्याचबरोबर संत्री एक ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे. हे फळ शरीराला तर हायड्रेट ठेवते, त्याचबरोबर शुगल लेव्हलदेखील नियंत्रणात ठेवते. सफरचंदात फायबर आणि अँटिऑक्सिडेंटेस भरपूर असतात. जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदतशीर असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज कमीत कमी एक सफरचंद खाल्ले पाहिजे. तसेच, बेरीजमध्ये अँटिऑक्सिडेंटस् आणि व्हिटॅमिन असतात. जे इन्सुलिनचे कार्य अधिक सक्षम करते. पालकमध्ये आयर्न आणि फायबर असतात. जे शरीरात इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पालक एक चांगला पर्याय आहे. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. पालकाचा ज्यूस, सूप किंवा भाजी बनवून तुम्ही खावू शकता. यात स्टार्च नसते आणि याचे ग्लायसेमिक इंडेक्सदेखील खूप कमी असते. ज्यामुळे ब्लड शुगरवर कोणताही चुकीचा परिणाम होत नाही. मेथीचे दाणे आणि भाजी दोन्हीही ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर आहे. तुम्ही मेथीची भाजी, पराठा किंवा काढा म्हणूनही खावू शकता. त्याचप्रमाणे ब्राेकलीमध्ये कार्बोहायड्रेट आणि हाय फायबर असते. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. गाजरात असलेले बीटा कॅरोटीन ब्लड शुगर कंट्रोल करते. रोज फक्त 50 ग्रॅम गाजर खाल्ल्याने शरीराला अनेक पोषकतत्त्वे मिळतात. त्याचप्रमाणे मशरूम एक लो कॅलरी आणि लो कार्ब व्हेजिटेलब आहे. जे ब्लड शुगर स्टेबल ठेवण्यास फायदेशीर आहे.