Published on
:
16 Nov 2024, 4:29 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:29 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ओव्हरटेकिंग करताना घडला असून कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. ओव्हरटेक करताना दाट धुक्यांमुळे समोरील वाहन न दिसल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते.
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश
माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोमध्ये प्रवास करणारे लोक मुरादाबाद रेल्वे स्थानकावरून धामापूरकडे येत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. झारखंडमध्ये लग्न आटोपून संपूर्ण कुटुंब घरी परतत होते. मृतांमध्ये 4 पुरुष, 2 महिला आणि 1 मुलीचा समावेश आहे. हे कुटुंब लग्न आटोपून परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता अपघातातील सर्व मृत झारखंडमधील एका लग्नातून घरी परतत होते. मृतांमध्ये खुर्शीद, त्यांचा मुलगा विशाल, सून खुशी याशिवाय मुमताज, पत्नी रुबी आणि मुलगी बुशरा यांचा समावेश आहे. हे कुटुंब झारखंडहून वधूसोबत परतत होते. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह एकूण 7 जणांचा मृत्यू झाला.