नाशिक : मतदार जनजागृतीसाठी महापालिकेच्या माध्यमातून काढण्यात आलेली सायकल रॅली.(छाया : हेमंत घाेरपडे)
Published on
:
16 Nov 2024, 4:37 am
Updated on
:
16 Nov 2024, 4:37 am
नाशिक : ‘माझं मत देशहितासाठी, माझं मतं लोकशाहीसाठी..’, ‘वोट कर नाशिककर...’, आदी घोषणांनी शुक्रवारी (दि. १५) शहर परिसर दुमदुमला. निमित्त होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी तसेच मतदानवाढीसाठी नाशिक महापालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीचे.
राजीव गांधी भवन येथे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी सायकलपटूंचे स्वागत करत रॅलीचा शुभारंभ केला. रॅलीत सहभागी सायकलपटूंनी ‘वोट कर नाशिककर’चे टी-शर्ट परिधान करून मतदार जनजागृतीपर घोषणा देत सेल्फी काढले. रॅलीतील सॅटरडे संडे ग्रुपच्या सर्व सायकलपटूंना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, गणेश मैड, नितीन धामणे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, विभागीय अधिकारी चंदन घुगे, मदन हरिश्चंद्र आदी उपस्थित होते.
मतदार सायकल रॅली यशस्वितेसाठी सायकल संस्थेच्या सॅटरडे संडे ग्रुपच्या अध्यक्षा तृप्तीदा काटकर, सुवर्णा कांगणे, चंदाराणी गवारे, निकिता आहेर, मीरा जोशी, मेघा सोनजे, सुवर्णा देशमुख ताजनपुरे, शिवाजी पारधी, गोविंद शिंदे, सुरेश पाळदे, डॉ. सुरेश भानुसे आदींसह देवदत्त शेळके, कैलास दराडे, मनीषा पाटेकर आदींनी परिश्रम घेतले.
राजीव गांधी भवन येथून सायकल रॅलीची सुरू झाली. येथून कॅनडा कॉर्नर, एमराल्ड पार्क, त्र्यंबक रोड एबीबी सिग्नल, सातपूर विभागीय कार्यालय, महेंद्र सर्कल येथून पुन्हा एबीबी सिग्नल, जेहान सर्कलमार्गे अशोक स्तंभ, घारपुरे घाट, पंचवटी विभागीय कार्यालय, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅन्ड, होळकर पूल, रविवार कारंजा, एमजी रोड, मेहर सिग्नल, सीबीएस सिग्नल ते राजीव गांधी भवन मुख्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.