दिवसा उकाडा कायम; उद्यापासून पारा घसरणार:किमान पारा 16 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज
2 hours ago
1
नोव्हेंबर महिना उजळला तरी यंदा थंडीचा प्रतीक्षाच होती. दिवाळीत उकाडा जाणवत होता. आता शहरात थंडीची चाहूल लागत आहे. सकाळी वातावरणात गारवा जाणवतो आहे. रात्री थंडी अनुभवायला येत आहे. मात्र, दिवसा उकाडा कायम आहे. दरम्यान सोमवारपासून तापमान घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. शहर परिसरात चार ते पाच दिवसांपासून कमाल पारा ३३ ते ३४ अंश सेल्सियसपर्यंत असला तरी किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. शहरातील किमान तापमान मागील काही दिवसांत १७ ते १९ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. आठवड्यात सोमवारी-मंगळवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सियस होते, तर किमान तापमान १९ अंश होते. दरम्यान गुरुवारी १ अंशाने पारा घसरला. गुरुवारी कमाल तापमान ३३ तर किमान तापमान १८ अंश नोंदवण्यात आले. शुक्रवारी पारा पुन्हा खाली आला. अजूनही दिवसभर शहरामध्ये थंडी पाहिजे तेवढी नाही. सकाळी हवेत गारवा असतो. पहाटे फिरणाऱ्या लोकांना उबदार कपडे घालून बाहेर पडावे लागते. मात्र, दिवसभर ३३ ते ३४ अंश सेल्सियस पारा असल्याने अल्प उकाडा जाणवतो. शुक्रवारी कमाल तापमान ३३ अंश नोंदवण्यात आले. तर किमान तापमानाची नोंद १७ अंश होती. आठवड्यात किमान तापमानामध्ये ३ अंशांपर्यंत घसरण झाली आहे. दरम्यान पुढील काही दिवसात जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबत कोरडा वारा असणार आहे. सोमवारपासून किमान आणि कमाल दोन्हीमध्ये घसरण होणार आहे. दिवस कमाल किमान १६ नोव्हेंबर ३३.४ १७.३ १७ नोव्हेंबर ३३.५ १७.३ १८ नोव्हेंबर ३३.६ १६.६ १९ नोव्हेंबर ३३.४ १६.५ २० नोव्हेंबर ३३.२ १६.२ असे राहील तापमान
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)