मनपाचे कचरा संकलनावरील दरमहा 12 लाख वाचणार!:शहरातील कचरा संकलनाचे आता महानगर पालिका देणार कंत्राट, निविदा प्रक्रिया सुरू

3 hours ago 1
शहराच्या स्वच्छतेवर दरमहा लाखो रुपये खर्च केला जातो. त्यातील दरमहा १० ते १२ लाख रुपये खर्च कचरा संकलनावर खर्च केला जातो मात्र, तरीही अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि कचरा दिसून येतो. त्यामुळे कचरा आणि अस्वच्छतेच्या या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने घनकचरा संकलनाचे काम कं‌त्राटी पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. महापालिकेने कचरा संकलनाचे काम कंत्राटी पद्धतीने दिल्यास, संबंधित कंत्राटदाराला मिळणाऱ्या उत्पन्नातून महापालिकेला काही टक्के महसूल मिळणार आहे. तसेच कचरा संकलनावर होणारा मनपाचा दरमहा १२ लाखांचा खर्च वाचणार आहे. ^सद्य:स्थितीत घरोघरी कचरा संकलनासाठी ३० रुपये महिना आकारला जातो. तर लहान व्यावसायिकांकडून १०० आणि मोठ्या व्यावसायिकांकडून २०० रुपये महिना आकारला जातो. दर ठरवण्याचे अधिकार मनपाकडे राहतील. लवकरच ही प्रक्रिया केली जाणार आहे. - संजय खोसे, स्वच्छता विभाग प्रमुख मनपाचे स्वच्छता कर्मचारी 715 घंटागाडीवर कचरा संकलक 100 शहरात घंटागाडी संख्या 100 कचरा संकलक ट्रॅक्टर 33 रोज कचरा संकलन 160 मॅ. टन दरमहा खर्च 12 लाख {शहरातील कचरा संकलनाचे काम कंत्राटी पद्धतीने दिल्यास कंत्राटदाराकडून मनपाला मिळेल महसूल. शहरात रोज १६० मे. टन कचरा शहरात सध्या दररोज १०० घंटागाड्या आणि ३३ ट्रॅक्टरद्वारे १६० मे. टन कचरा संकलित केला जात आहे. शहरात संकलित झालेला हा कचरा नायगाव आणि खडकी येथील ट्रान्सफर स्टेशनवरुन भोड येथील बायोमायनिंग प्रकल्पावर पाठवला जातो. तेथे शहरातील कचऱ्यावर बायोगॅस प्रक्रियेने जैविक खत व वीज निर्मिती केली जात आहे. नायगाव आणि खडकी येथील डम्पिंगवर वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याचे ढीग झीरो गारबेज करण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कार्यान्वित असून, भोड येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पात सर्वसाधारण दररोज शंभर टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. दररोज १६० मेट्रिक टन कचरा सध्या शहरातून दररोज १६० मेट्रिक टन कचरा उचलला जातो. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील कचरा गोळा करण्याचे काम महापालिकेच्या स्तरावर सुरु आहे. घंटा गाड्या शहरातील कचरा गोळा करतात. जमा झालेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर (ट्रान्स्फर स्टेशन) टाकला जातो. शहरातील कचरा घंटागाडीतून संकलित करण्याचे काम आता कंत्राटी पद्धतीने काम सुरु करण्यावर सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती आहे. दर ठरवण्याचे अधिकार मनपाकडेच

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article