बाळासाहेब ठाकरे यांना 'भारतरत्न' म्हणजे वीर सावरकरांचाही सन्मान:जन्म शताब्दी वर्षाच्या आधी निर्णय घेण्याची संजय राऊत यांची मागणी

4 hours ago 2
भारतीय जनता पक्ष हा चिनीमाल आहे. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेसारखा चिनी माल बाजारात आणत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरी शिवसेना ही मातोश्रीतच आहे. तसेच शिवसेना बाबातचे सर्व निर्णय मातोश्री मधूनच होत असतात, असा दावा देखील त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी देखील राऊत यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देणे म्हणजे वीर सावरकरांचाही सन्मान करण्यासारखे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ही आमच्या शिवसेनेची अधिकृत मागणी असल्याचेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही अमित शहा यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही काय झुंज दिली, हे माहिती नाही. त्यांना खरी शिवसेना ही काय आहे हेच माहीत नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली आणि त्या विरोधात आम्ही आजही उभे आहोत. हीच आम्हाला बाळासाहेबांनी दिलेली प्रेरणा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे हे नकली हिंदुहृदयसम्राट नव्हते तर ते कृतिशील हिंदुहृदयसम्राट होते. हातात कोणतीही सत्ता नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला. महाराष्ट्रात कसलीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसांसाठी लढा दिला. त्यांनी हिंदूंसाठी कवच कुंडले तयार केली तीच कवच कुंडले मोदी-शहांनी तोडली आहे. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊत गौरव करा बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हते. ते ढोंगींवर हल्ला करणारे, ढोंगीपणाचा प्रतिकार करणारे होते. आता हुंदुत्त्वाच्या नावाने देशात जे ढोंग सुरू आहे. त्याच ढोंगाला प्रतिकार करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने यांच्या नावाने होणारे ढोंग बंद करा आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊत त्यांचा गौरव करा, ही शिवसेनेची मागणी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. अपात्र व्यक्तींनाही मोदी-शहांनी भारतरत्न दिला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी नियम डावलून भारतरत्न देण्यासाठी योग्य नसलेल्या व्यक्तींना देखील भारतरत्न दिलेला आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिला तर तो वीर सावरकरांचा देखील गौरव होईल, त्यामुळे त्यांचे नाव घेऊन ढोंग बंद करा, अशा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे. आता आम्हालाच प्रवेश द्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आम्हाला प्रवेश द्या, म्हणून अर्ज केला आहे. बाकी सर्वच तिकडे गेले आहेत. अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. बाळासाहेबांचा पवित्र जन्मदिवस आहे तो कलंकीत करण्याचे काम एकनाथ शिंदे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जे बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहेत ते देखील आमच्या पक्षात प्रवेश करत असल्याचा त्यांनी जाहीर करावे, अशा खोचक शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. आज बीकेसी मध्ये होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे गटाचे अनेक प्रमुख नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे, यावर त्यांनी टीका केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article