महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरण:मुंडे कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा- जितेंद्र आव्हाड
4 hours ago
2
परळी तालुक्यात महादेव मुंडे यांचा खून झाला होता. पण वाल्मीक कराडमुळे त्यातले खरे आरोपी मोकाट आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान 22 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. हत्येतील आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही, हत्येतील आरोपी वाल्मीक कराडच्या मुलाच्या आवतीभवती फिरतात असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात वाल्मीक कराडच्या मुलाच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आम्हालाही न्याय मिळायला हवा- ज्ञानेश्वरी मुंडे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, परळीत माझ्या नवऱ्याची पंधरा महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली, मात्र अजूनही माझ्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही, जसं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाकडून सीआयडी, एसआयटी स्थापन करण्यात आली होती, तसेच माझ्या नवऱ्याच्या खून प्रकरणातही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याच पद्धतीने सीआयडी एसआयटी स्थापन करून गुन्ह्याचा तपास तात्काळ करावा व माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा आव्हाडांचे नेमके ट्विट काय? जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले की, परळी तालुक्यातील महादेव मुंडे यांचा खून 14 महीन्यापूर्वी झाला आहे. त्यातील आरोपी तात्कालीन पी.आय रवी सानप यांनी शोधले होते, मात्र वाल्मीक कराड याने खरे आरोपी अटक करण्या ऐवजी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांना आरोपी करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला होता. रवी सानप यांना खरे आरोपी माहित आसल्यामुळे राजाभाऊ फड यांना आरोपी करण्यास नकार दिला. त्यामुळे रवी सानप यांची बदली वाल्मीकने केली असून, आजपर्यंत महादेव मुंडे यांचा खून करणारे आरोपी परळीत उघड फिरत आहेत. गेल्या 14 महिन्यापासून महादेव मुंडे यांचे कुटुंब न्यायासाठी पोलिसांचे ऊंबरठे झिजवत आहेत. न्यायासाठी दारोदार भटकणाऱ्या महादेव मुंडेच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)