मराठवाडा, विदर्भासह मुंबईही स्वतंत्र झाली पाहिजे:गुणरत्न सदावर्ते यांचे खळबळजनक विधान, छोटे राज्य निर्मितीतून विकास होण्याचा दावा
2 hours ago
1
मराठवाडा, विदर्भासह मुंबईही स्वतंत्र झाली पाहिजे, असे खळबळजनक विधान गुणरत्न सदावर्ते यांनी केले. माझी ही भाषा कोणत्या पक्षाची नाही. माझी संविधानाची भाषा असून छोटे राज्याच्या निर्मितीतून विकास होईल, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला. गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबई स्वतंत्र झाली पाहिजे, या विधानाने चर्चांना उधाण आले आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मराठवाडा स्वतंत्र झाला पाहिजे, विदर्भ स्वतंत्र झाला पाहिजे, मुंबईसुद्धा स्वतंत्र झाली पाहिजे, असे खळबळजनक विधान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. संविधानाची भाषा बोलून छोटे राज्य निर्माण झाले पाहिजे, असे माझे मत असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. छोटे राज्य निर्मितीतून पूर्ण मानवी विकास होत असेल, तर तीच माझी भाषा राहील. माझी भाषा जोर आणि जबरदस्तीचे नसणार, असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले. फडणवीसांना मुख्यमंत्री केले पाहिजे
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री पद आणि मनोज जरांगे यांच्यासह विविध मुद्यांवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे, ही माझी भावना आहे. जनभावना आणि मतदारांच्या भावना लक्षात घेऊन फडणवीस यांना मुख्यमंत्री केले पाहिजे, अशी मी भाजपला विनंती करतो, असे सदावर्ते म्हणाले. मनोज जरांगेंचा बोलवता धनी शरद पवार
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला आहे. मनोज जरांगे हे स्क्रिप्टेड बोलतात, त्याचा बोलवता धनी शरद पवार असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मनोज जरांगे नावाचा फॅक्टर, 204 बोलत आहे, एक लाख लोकांना उपोषांना बसवणार, पोलिस कुठून आणणार, डॉक्टर कुठून आणणार, यंत्रणेला वेठीस धरणे हाच जरांगे फॅक्टर असल्याची टीका सदावर्ते यांनी केली. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करुन, समाजाला टार्गेट करुन वागण्याचा प्रयत्न करत आहेत, ते महाराष्ट्रात चालणार नाही, असेही ते म्हणाले. हे ही वाचा... आजचे एक्सप्लेनर:फडणवीस प्रबळ दावेदार, मात्र अनेक फॅक्टर शिंदेंच्या बाजूने; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घ्या सर्वकाही यावेळचा सर्वात मोठा प्रश्न आहे – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा केवळ युतीच्या मुख्यमंत्र्यांचा विषय नाही, तर तो महाराष्ट्राचे भविष्यातील राजकारण ठरवेल. आजचे एक्सप्लेनर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर…सविस्तर वाचा निकालानंतर पहिल्यांदाच अजित पवारांचा शरद पवारांवर आरोप:माझ्या विरोधात पुतण्या तर आत्रामांविरोधात मुलीलाच उभे केले माझ्या विरोधात माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाला म्हणजे माझ्या सख्ख्या पुतण्याला उभे करण्याचे काहीच कारण नव्हते. बारामतीमध्ये इतरही अनेक उमेदवार होते. लोकसभा निवडणुकीत माझी चूक झाली हे मी आधीच सांगितलं होते. मात्र, तरी देखील माझ्या विरोधात माझा सख्खा पुतण्या उभा केला. अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)