मराठवाड्यात 7.60 लाख लाडक्या बहिणींचे मतदान वाढले:लाडकी बहीण योजनेचा 46 मतदारसंघांत प्रभाव, पुरुष मतदानातही 6.44 लाखांनी वाढ

3 days ago 2
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी राज्यात सर्वाधिक नोंदणी केली. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला. पहिल्यांदाच विभागातील ४६ मतदारसंघांमध्ये महिला मतांची संख्या पुरुषांच्या तुलनेत वाढली आहे. पुरुष मतांमध्ये २०१९ च्या तुलनेत ६.४४ लाख मतांची वाढ झाली तर महिला मतांची संख्या ७.६० लाखांनी वाढली आहे. पुरुषांपेक्षा तब्बल १.१५ लाख अधिक महिलांनी या वेळी मतदान केले. यावरून लाडक्या बहिणींच्या वाढलेल्या मतदानाचा निकालावर नेमका काय परिणाम होणार हे शनिवारीच स्पष्ट होणार आहे. मध्य प्रदेशमधील लाडली बहना योजनेचे बंपर यश महाराष्ट्रात घेण्यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली. योजनेचा राज्यात २.३० कोटी तर मराठवाड्यामध्ये २१.२ लाख महिलांना लाभ मिळाला, या लाभार्थींना मतांमध्ये परिवर्तित करण्याची महायुती सरकारची कसोटी होती. बुधवारी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून मराठवाड्यात यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून येते. महिला मतांची वाढलेली आकडेवारी ही याचेच द्योतक असल्याचे लक्षात येते. विधानसभेसाठी २०१९ मध्ये ४४ लाख ४३ हजार ६२२ महिलांनी मतदान केले होते त्या तुलनेत या वेळी ही संख्या ७.६० लाखांनी वाढून ५२ लाख ३ हजार ८८४ झाली आहे, तर वाढलेल्या पुरुष मतदानाच्या तुलनेत या वेळी महिला मतांमध्ये तब्बल १ लाख १५ हजारांची वाढ झाली आहे. मराठवाड्यातील ४६ पैकी सर्वाधिक महिला मतांची संख्या वाढलेल्या टॉप १० मतदारसंघांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे गंगापूर, संभाजीनगर पश्चिम, वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या सहांचा समावेश आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article