मुंबईत पुन्हा असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. डोंबिवलीमधील 82 वर्षांच्या वृद्ध नागरिकाला हिंदीत बोलण्यास भाग पाडण्यात आलं. मुंबईतील महापेक्स प्रदर्शनात हा संतापजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर ' तुम्ही कुठेही तक्रार करा, आमचं काहीच वाकडं होणार नाही' असं म्हणत अधिकाऱ्याने अरेरावी केली
मुंबईत मराठी भाषेच्या मुद्यावरून पुन्हा पेटला वादImage Credit source: tv9
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी-अमराठी वाद बराच रंगला आहे. मराठी बोलण्याच्या मुदयावरूनही अनेकदा वाद झाले आहेत. त्यातच आता मुंबईत पुन्हा असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. डोंबिवलीमधील 82 वर्षांच्या वृद्ध नागरिकाला हिंदीत बोलण्यास भाग पाडण्यात आलं. मुंबईतील महापेक्स प्रदर्शनात हा संतापजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर ‘ तुम्ही कुठेही तक्रार करा, आमचं काहीच वाकडं होणार नाही’ असं म्हणत महापेक्स प्रदर्शनातील अधिकाऱ्याने त्या ज्येष्ठ नागरिकासोबत अरेरावी केली. या घटनेनंतर ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरेल असं वाटत नाही. याप्रकरणी संबिधत ज्येष्ठ अधिकाऱ्याने मुंबई जीपीओच्या फिलाटेलिक ब्युरोकडे तक्रार केली आहे.
एकीकडे मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. मराठी बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले. शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मात्र सरकारने हा निर्णय घेतलेला असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच मराठीची ही दुरावस्था होत असून अधिकारी मराठीत बोलण्यास नकार देत ज्येष्ठांचा थेट अमपान करताना दिसत आहेत. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे.
ही बातमी अपडेट होत आहे.