महात्मा फुले यांच्या विचारांचे संत गाडगेबाबा खरे वारसदार:संत महिमा व्याख्यानमालेत प्रा. राजेश गवळी यांचे प्रतिपादन

2 hours ago 1
महात्मा जोतिराव फुलेंच्या विचारांचे खरे वारसदार संत गाडगेबाबा आहेत, असे प्रतिपादन प्रा. राजेश गवळी यांनी केले. अलुतेदार, बलुतेदार संस्थेतर्फे आयोजित संत महिमा व्याख्यानमालेत ते बोलत होते. अलुतेदार, बलुतेदार समितीने जिल्ह्यात विविध समाजात जन्म घेतलेल्या व मानव उद्धारासाठी काम केलेल्या संतांचा परिचय समाजातील नवीन पिढीला व्हावा व त्यातून संघर्षशील तरुण पिढी घडावी, या हेतूने संत महिमा (महात्म्य) व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या श्रृंखलेतील ११ वे पुष्प प्रा. राजेश गवळी यांनी कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जीवनकार्यावर गुंफले. गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात या व्याख्यानाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मदन गाजले होते. उद्घाटन प्रकाश वाढे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गाढे अभ्यासक धोटे गुरुजी, विनोद बाभुळकर, रामदास भाग्यवंत, जोती सैरिसे, मोकलवार, कुवे, इमासंचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर डांगरकर, अनुष्का बेलोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. गवळी यांच्या व्याख्यानादरम्यान संपूर्ण सत्यशोधक गाडगेबाबा श्रोत्यांसमोर उभे राहिले. व्याख्यानादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्याशी गाडगेबाबांचे असलेले नाते उलगडले गेले. जात-पात धर्म-अधर्माचा विचार सोडून माणसांत देव पाहणारे गाडगे बाबा आजच्या तरुणांचे आयकॉन झाले पाहिजे, असे मतही प्रा. गवळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान ज्यांनी समाजकार्याला वाहून घेतले त्यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेचे उद्दिष्ट अलुतेदार, बलुतेदार भटक्या विमुक्त व अल्पसंख्याक जनजाती समन्वय समितीचे अध्यक्ष वासुदेवराव चौधरी यांनी सांगितले. समितीचे महासचिव व बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीराम कोल्हे यांनी नवकार्यकारिणीची घोषणा केली. कार्यक्रमाला गाडगे बाबा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. वसंत जामोदे, नंदू सहारे, नंदकिशोर नेतनवार, रवींद्र वानखडे, रजनी आमले, अविनाश राजगुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article