महायुतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता:मुख्यमंत्री पदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे

19 hours ago 1
महायुतीत मुख्यमंत्री पदावर पेच निर्माण झाल्याने सरकारस्थापनेलाही उशीर होत आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेत ओढातानी सुरू असल्याने दिसून येत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री पदासह विविध विषयांवर भाष्य केले. महायुतीच्या मुख्यमंत्री पदासंर्भात राष्ट्रीय पातळीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. महायुतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे हा विरोधकांचा रडीचा डाव आहे, अशी टीका सुनिल तटकरे यांनी केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, महायुतीला महाराष्ट्रातील जनतेले यश दिलेले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात काँग्रेसला सर्वाधिक जास्त बहुमत मिळत होते, त्यापेक्षाही जास्त मत महायुतीला मिळाले आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय एक दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे. तो निर्णय झाला की राज्य सरकार स्थापन होईल. ज्या गतीने अडीच वर्षांत महायुती सरकारने काम केले आहे, तेवढ्याच गतीने महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या सहाय्याने केला जाईल. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय वरिष्ठ घेतील राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना सुनिल तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. तसेच महायुतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. जे काही ठरेल ते एक दोन दिवसात ठरेल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. मंत्रिपदाचा निर्णयही तिनही पक्षांचे निर्णय घेतील सुनिल तटकरे यांनी मंत्रिपद वाटपावरही भाष्य केले. मंत्रिपद वाटप संदर्भातील निर्णय भाजपच्या पक्षश्रेष्ठींबरोबर बसून राज्यातील तिनही नेते एकत्रितपणे घेतील. त्यावेळी मंत्रिपदाची संख्या, विभाग आणि खात्यांबाबतही निर्णय होईल, असे तटकरे यांनी सांगितले. ईव्हीएमवरून विरोधकांचा रडीचा डाव ईव्हाएमवर उपस्थित केलेल्या शंकावर बोलताना सुनिल तटकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. विरोधकांचा हा रडीचा डाव आहे. लोकसभेला यश मिळाला तेव्हा त्यांच्या कर्तुत्वाने मिळाले, असा ढिंडोरा ही मंडळी पिटत होती. सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हाएम संदर्भातील याचिका फेटाळली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. परंतु, रडीचा डाव खेळण्यात अर्थ नाही, असा टोला विरोधकांना लगावला. अस्वस्थ झालेल्या लोकांकडून असे वक्तव्ये येऊ शकतात, अशी टीकाही सुनिल तटकरे यांनी विरोधकांवर केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article