महाराष्ट्राच्या नवा कारभारी कोण?:शिंदे, फडणवीस, अजितदादांची आज अमित शहांसोबत बैठक, त्यानंतर नाव घोषित होण्याची शक्यता

2 hours ago 2
आज महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते. त्यासाठी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तूर्त पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे मानले जात आहे. मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला पोहोचलेत. तत्पूर्वी बुधवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे मुख्यमंत्रीपद आम्हाला मान्य असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मला पदाची लालसा नाही. मी मुख्यमंत्री असताना मोदी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते. आता ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. शिंदे म्हणाले- मी 26 नोव्हेंबर रोजी मोदींना फोन केला होता. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. मी अडथळे निर्माण करणारा माणूस नाही. आम्ही सर्वजण एनडीएचा भाग आहोत. बैठकीत जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल. कोणताही स्पीड ब्रेकर नाही. शिवसेना सरकार स्थापनेत अडथळा बनणार नाही. शिंदे म्हणाले- मी स्वतःला कधीच मुख्यमंत्री समजले नाही. मी नेहमीच एक सामान्य माणूस म्हणून काम केले. हा जनतेचा विजय आहे. पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार. मी निवडणुकीच्या काळात पहाटे 5 वाजेपर्यंत काम केले. सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिंदे यांच्या वक्तव्याने सर्वांच्या शंका दूर झाल्या आहेत. महायुतीमध्ये कधीही मतभेद झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या नावावर लवकरच निर्णय घेऊ. शिंदेंना मोदींचा प्रत्येक निर्णय मान्य, 6 महत्त्वाची विधाने 1. मी एक सामान्य माणूस, मी स्वतःला कधीच मुख्यमंत्री मानले नाही एकनाथ शिंदे म्हणाले, "सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्या मला कळतात. मी कधीच स्वत:ला मुख्यमंत्री समजले नाही. मी नेहमीच सामान्य माणूस म्हणून काम केले. कुटुंब कसे चालते ते मी पाहत आलो आहे. मला वाटले की, सत्ता मिळाल्यावर मी, ज्यांना त्रास होत आहे त्यांच्यासाठी योजना आणेल." 2. लाडका भाऊ ही लोकप्रियता खूप चांगली शिंदे म्हणाले, "मी मुख्यमंत्री असताना, लोकांना हा आपल्यातला मुख्यमंत्री आहे, असे वाटायचे. घर असो, मंत्रालय असो, लोक मला भेटायला यायचे. मला जी ओळख मिळाली ती तुमच्यामुळेच. मी लोकप्रियतेसाठी नाही तर जनतेसाठी काम केले. राज्यातील बंधू व भगिनी आनंदी आहेत. बहिणींनी मला साथ दिली व संरक्षण केले. आता मी त्यांचा लाडका भाऊ आहे, ही ओळख खूप चांगली आहे. 3. राज्याला पुढे नेण्यासाठी केंद्राची साथ आवश्यक एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही अडीच वर्षे सरकार चालवले. या काळात केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभे राहिले. आमच्या प्रत्येक प्रस्तावाला पाठिंबा मिळाला. राज्य चालवण्यासाठी केंद्र सरकारची साथ आवश्यक आहे. ." 4. आम्ही आडकाठी नाही, शिवसेना मोदींचा निर्णय मान्य करेल शिंदे म्हणाले, "मी मोदी-शहांना फोन केला. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल, असे सांगितले. भाजपच्या बैठकीत तुमचा उमेदवार निवडला जाईल, तोही आम्हाला मान्य असेल. सरकार स्थापनेत आमचा कोणताही अडथळा नाही. सरकार स्थापनेबाबत तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असला तरी शिवसेनेचा आणि माझा कोणताही अडथळा नाही. 5. मोदी-शहा अडीच वर्षे खडकासारखे एकत्र उभे राहिले ते म्हणाले, "आम्ही अडीच वर्षे सरकार चालवले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली. दोघेही अडीच वर्षे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला सांगितले की तुम्ही जनतेचे काम करा आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. 6. मला पदाची लालसा नाही, महाराष्ट्रात स्पीड ब्रेकर नाही एकनाथ शिंदे म्हणाले, "मला पदाची हौस नाही. आम्ही लढणारी माणसे नाही. आम्ही काम करणारी माणसे आहोत. मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही सांगितले आहे की, महाराष्ट्रात एकही स्पीड ब्रेकर नाही, कोणी नाराज नाही, कोणीही नाही. येथे कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीचा एक अडथळला होता, तो ही आता दूर झाला आहे. MVA संयुक्तपणे विरोधी पक्षनेत्यावर दावा करू शकते विधानसभा निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाला सभागृहात विरोधी पक्षनेत्यासाठी (LoP) आवश्यक असणाऱ्या जागा मिळाल्या नाहीत. नियमांनुसार, विधानसभेच्या किमान 10% जागा जिंकणाऱ्या विरोधी पक्षाला हे पद दिले जाते. अनेक पक्षांना यापेक्षा जास्त जागा मिळाल्या असतील तर सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या विरोधी पक्षाला हे पद दिले जाते. यावेळी तसे नाही, त्यामुळे MVA संयुक्त LoP च्या पदावर दावा करू शकते. या संदर्भात राज्यपालांना पत्र लिहून निवडणूकपूर्व युतीचा युक्तिवाद करण्यात येणार आहे. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article