अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा file photo
Published on
:
28 Nov 2024, 7:37 am
Updated on
:
28 Nov 2024, 7:37 am
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस अखेर गुरुवारी त्यांच्या बँक खात्यात जमा झाला. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही २९ हजार रुपये बोनस देण्यात आला असून त्यांच्या या बोनसमधून पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे आयकर कापण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.