देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महायुतीच्या नेत्याची रीघ:मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी इच्छुकांचे लॉबिंग

2 hours ago 2
महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेणार आहे. यातच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्षांच्या आमदारांची भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर रीघ लागली आहे. मंत्रिपदावर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक आमदारांकडून लॉबिंग सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदासह काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा असल्याने यात आपल्या नावावर शिक्कामोर्तब व्हावा यासाठी सर्वच आमदार प्रयत्न करत आहेत. यातच रवी राणा, नवनीत राणा, धनंजय मुंडे, भरत गोगावले, जयकुमार रावल, सुधीर मुनगंटीवार, आशिष देशमुख यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. सागर बंगल्याबाहेर सदैव मुख्यमंत्री म्हणून बॅनर देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याच्या बाहेर फडणवीस यांना महाराष्ट्राचे सदैव मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत. बॅनरवर फडणवीस शपथ घेताना दिसून येत आहेत. शिंदेंच्या स्पष्टीकरणामुळे सर्व शंका दूर -फडणवीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरणामुळे सर्वांच्या शंका दूर झाल्या आहेत. महायुतीमध्ये कधीही मतभेद झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या नावावर लवकरच निर्णय घेऊ. श्रीकांत शिंदेंची नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री लागणार वर्णी? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आमची काही अडचण राहणार नसून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय शिवसेनेला मान्य असल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. उपमुख्यमंत्रिपदासाठी दादा भुसेंचेही नाव चर्चेत दुसरीकडे, उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांचे निकटचे स्नेही व विश्वासू सहकारी दादा भुसे यांचे नाव देखील समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात भुसे यांनी त्यांची साथ देत वेळोवेळी पक्षाची भूमिकाही समर्थपणे निभावली. दादा भुसे सलग पाचवेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. तसेच ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री राहिले आहेत. दादा भुसे नाशिक, धुळे आणि पालघरचे पालकमंत्रीही होते. त्यामुळे दादा भुसे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे उपमुख्यमंत्रिपद येण्याची जास्त शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा... महायुतीचे खातेवाटप जवळपास निश्चित:भाजप 'गृह'सह 3 महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार; NCP ला महसूल, शिंदेंच्या शिवसेनेला काय? राज्यात महायुतीचे सरकार येणार अन् भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता फिक्स झाले आहे. यातच आता भाजप अर्थ, गृह, आणि सामान्य प्रशासन ही महत्त्वाची 3 खाती आपल्याकडे ठेवणार असल्याचे समोर येत आहे. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article