महाराष्ट्रात परिस्थिती पाहता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो:मविआतील तिन्ही पक्ष एकत्र राहणार नाही- बच्चू कडू
6 hours ago
1
राजकारणात काहीही होऊ शकते. झारखंडमध्ये एक आमदार मुख्यमंत्री होऊ शकतो. राज्यातील परिस्थिती बघता प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे वक्तव्य प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी केले आहे. तर महाविकास आघाडीमधील पक्ष निवडणुकीनंतर एक राहणार नाही, त्यांना आमच्यासोबत यावे लागेल, असे त्यांनी बोलताना म्हटले आहे. दरम्यान बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, मतदानाचा टक्का वाढला आहे. त्याला विविध कारणे आहेत. निवडणुकीत लाडक्या बहीण योजनाचा परिणाम दिसेल. त्याच हिशोबाने सरकारने योजना आणली होती. राज्यात लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनविणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा द्यावा लागेल. आमच्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही बच्चू कडू म्हणाले की, आमचे 17 मुद्दे आहेत. हे मुद्दे घेऊन आम्ही समोर जात आहोत. महाविकास आघाडीतील कुठले पक्ष एकत्र राहणार नाही त्यांना आमच्यासोबत यावे लागेल. आम्ही सत्ता स्थापन करणार हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. सत्ता आम्ही स्थापण करु बाकीच्या लोकांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. कुणाची सत्ता येईल हे चित्र दिसत नाही अन् आमच्याशिवाय राज्यात सत्ता येईन् असे होऊच शकत नाही, विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी हा दावा केला. काँग्रेस अन् भाजप संभ्रमात बच्चू कडू म्हणाले की, भाजपने अतिशय खालच्या पातळीवर प्रचार केला. एकंदरित काँग्रेस आणि भाजप हे मतदारसंघात संभ्रमात होते. शेवटच्या क्षणी भाजपने काँग्रेस चालवा असे सांगितले तर कुठे काँग्रेसने भाजपला मतदान करा असे सांगितले. यात दोघेंही एकमेंकाशी लढत राहिले. त्यांनी निवडणूक जिकंण्यासाठी नाही तर मला पराभूत करण्यासाठी लढवली. पण माझे मतदार पक्के आहेत त्यांनी मलाच मतदान केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)