Published on
:
12 Oct 2024, 7:58 am
Updated on
:
12 Oct 2024, 7:58 am
वाळूज महानगर: लग्नाअगोदर महिलेसोबत शारीरिक संबंध असल्याचा मॅसेज तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवून दोघांचे एकत्रित अश्लील फोटो फोनवर टाकण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज महानगरात राहणारी २४ वर्षीय पीडिता लग्नापूर्वी एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान तिची ओळख आदित्य अनिल पवार याच्यासोबत झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आदित्य हा पीडितेला आपण बाहेर फिरायला जाऊ, असे नेहमी म्हणायचा. तसेच तू जर माझ्यासोबत बाहेर फिरायला आली नाही तर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, असे म्हणून आदित्यने जुलै २०२३ मध्ये तिला पंढरपूर येथील एका हॉटेलवर नेऊन बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध न्त प्रस्तापित केले.
त्यानंतर पीडितेने वेळोवेळी आदित्यकडे लग्नाचा विषय काढला. मात्र त्याने टाळाटाळ करून लग्न करण्यास नकार दिला. काही दिवसांनी पीडितेच्या घरच्यांनी नात्यातील स्थळ पाहून एप्रिल २०२४ मध्ये तिचे लग्न लावून दिले. पीडिता पतीसह सासरी नांदत असताना आदित्य याने पीडितेच्या पतीच्या मोबाईलवर तुझी पत्नी व माझे शारीरिक संबंध आले आहे. मी तिच्यासोबत लग्न करणार होतो, असा मॅसेज टाकून दोघांचे एकत्रित फोटो मोबाईलवर टाकण्याची धमकी दिली.