माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सत्तेस्थापनेपूर्वी शिवसैनिकांना महत्त्वाचे आवाहन
2 hours ago
1
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी शिंदेसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांमधून होत आहे. एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून महायुतीने निवडणूक लढवली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद द्यावे असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत शिवसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी काय केले आवाहन?
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये, अशी विनंतीही एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केली. तसेच समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे ते आज राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील सरकारचा शपथविधी होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस सोमवारी सायंकाळी दिल्लीला गेले होते. त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्या मुळे आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचा दावा भाजपशी संबंधित सूत्रांनी केला आहे. दिव्य मराठी नेटवर्कच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला आहे. हे ही वाचा... मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या खासदारांची दिल्लीत लॉबिंग:नरेंद्र मोदींकडे मागितली भेटीची वेळ, माजी खासदारांचाही समावेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. विद्यमान खासदारांसोबत या शिष्टमंडळामध्ये काही माजी खासदारांचा देखील समावेश असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी या खासदारांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण बातमी वाचा... मुख्यमंत्रिपदासाठी 178 आमदारांची देवेंद्रांना पसंती:एकनाथ शिंदेंची समजूत काढून अमित शहा घेणार अंतिम निर्णय महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सोमवारी रात्री दिल्लीत एका खासगी कार्यक्रमानिमित्त गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस यांनी मात्र अशी कोणतीही पूर्वनियोजित बैठक नव्हती, असे सांगून जास्त बोलणे टाळले. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)