मालेगाव-नाशिक येथील कथित व्होट जिहाद प्रकरणाचा म्होरक्या नागनी अक्रम मोहंमद शफी याला बुधवारी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अहमदाबाद विमानतळावर ताब्यात घेतले. तो दुबईला पलायनाच्या तयारीत होता. शफीला ईडीने अटक केल्यानंतर गुरुवारी विशेष न्यायालयाने त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. शफीने मालेगाव येथील व्यापारी सिराज अहमद हारुण मेमनच्या साथीने नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत १४ बँक खाती उघडून हवाला व्यवहारामार्फत विविध बोगस कंपन्यांमध्ये १०० कोटी रुपये वर्ग केले होते. याप्रकरणी मेमनला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. शफीविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्यानुसार इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला विमानतळावर ताब्यात घेतले. २०० फर्ममधून २ महिन्यांत ११८.४० कोटी वर्ग आतापर्यंत केलेल्या तपासानुसार २०० फर्म-कंपन्यांच्या माध्यमातून केवळ दोन महिन्यांत १४ बँक खातेधारकांच्या खात्यात एकूण ११८.४० कोटी रुपये वर्ग करण्यात आले. त्यासाठी खातेधारकांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती. ही रक्कम संबंधित खात्यांमध्ये पडताच तत्काळ विविध खात्यांमध्ये पुन्हा वर्ग करण्यात आली, असे ईडीने म्हटले आहे. शफीच्या ताब्यात ८ कोटी शफीच्या ताब्यात ८.६६ कोटी रुपये आढळले असून तो जाणीवपूर्वक या अफरातफरीमध्ये सहभागी होता हे स्पष्ट झाल्याचे ईडीने तपासात म्हटले आहे
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)