माळीनगर फेस्टीव्हलची तयारी अंतिम टप्प्यात, उंच पाळण्याची उभारणी सुरू:2 ते 5 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी मेजवानी
2 hours ago
1
माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील नागरिकांचे खास आकर्षण असलेल्या ''माळीनगर फेस्टिव्हल'' व ''विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन'' या भव्य सांस्कृतिक महोत्सवाला सोमवार दि.२ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. फेस्टिव्हलसाठी उंच पाळण्याची तसेच मनोरंजन नगरी आणि स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. माळीनगर फेस्टिव्हल चे हे १९ वे वर्ष आहे.कोरोना कालावधी वगळता २००४ पासून दरवर्षी हा महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक तथा दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दि सासवड माळी शुगर फॅक्टरी,दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, शुगरकेन सोसायटी,महात्मा फुले पतसंस्था,माळीनगर मल्टिस्टेट व माळीनगर विकास मंडळ माळीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि मॉडेल विविधांगी प्रशालेच्या भव्य मैदानावर दि.२ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा माळीनगर फेस्टिव्हल होणार आहे. मॉडेल विविधांगी प्रशालेच्या मैदानावरील खुल्या भव्य रंगमंचावर सासवड माळी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा,हायस्कूल,ज्यु कॉलेज, किमान कौशल्य व गुलमोहर इंग्लिश मीडियम स्कूल या विभागातील विद्यार्थ्यांचे सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत रोज विविध गुणदर्शन कार्यक्रम व सांस्कृतिक स्नेहसंमेलनही होणार आहेत.यात १ ते ९ वी व ११ वी पर्यंतचे विद्यार्थी आपली कला सादर करतील. ११० स्टॉलसह मनोरंजन नगरीची उभारणी सुरू या फेस्टिव्हलमध्ये ११० पेक्षा जास्त स्टॉल्स उभारण्यात येत असून महिलांसाठी ज्वेलरी, इमिटेशन, विविध प्रकारचे कपडे,शोभेच्या वस्तू,चपला, बालगोपाळा ंसाठी खेळणी तसेच खवय्यांसाठी विविध व्हेज, नॉनव्हेज इंडियन,चायनीज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स चा समावेश आहे. मनोरंजन साधने उभारण्यात येत आहेत. यात मोठा पाळणा,ब्रेक डान्स,सॅलेम्बो, कोलंबस (जहाज),ड्रॅगन ट्रेन,टोराटोरा,वॉटर बोट,मिनी ट्रेन यासह यावर्षी नवीनच टॉवर बोल्ट,वॉटर बलून ही साधने उभारण्यात येत आहेत.लहान मुलांसाठी जम्पिंग,बाऊंसी,मिकी माऊस आदी साधने समाविष्ट आहेत .
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)