देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत मंदिर म्हणजे शिर्डीतील साई मंदिर आहे. देशभरातील कोट्यवधी भाविकांची श्रद्धा साईबाबांवर आहे. परंतु साईबाबा हिंदू होते की मुस्लीम होते? यावर काही वेळा वाद निर्माण केला जातो. वादग्रस्त वक्तव्य करण्यासंदर्भात प्रसिद्ध असलेले कालीचरण महाराज यांनी या विषयात उडी घेतली आहे. ते म्हणाले, साईबाबा मुसलमान होते. या प्रचार प्रसाराला बळी न पडता साई बाबांची भक्ती करावी. साई बाबा कट्टर हिंदू होते. त्याच मी प्रमाण दिलेले आहे. जन्म आणि कर्माने साई बाबा हिंदू होते. हिंदू संस्कार आणि परंपरेत साई बाबांचा जन्म झाला. सर्व हिंदूंनी या षडयंत्रेला बळी न पडता कट्टर साई बाबांची भक्ती करावी आणि जगाचा उद्धार करावा, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यासंदर्भात बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, प्रयागराजला मी स्वतः जाऊन आलेलो आहे. तिथे व्यवस्था एकदम चोख आणि उत्तम आहे. हिंदू धर्मा विरोधात षडयंत्र रचले जात आहे. सर्व हिंदूंनी तिकडे जाऊन स्नान करावे आणि पुण्य प्राप्त करून घ्यावे.
…तर हिंदू राष्ट्राची स्थापना होणार
कालीचरण महाराज यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर मत व्यक्त केले. त्यांनी या निकालावरुन भाजपचे अभिनंदन केले. सर्व हिंदू जागृत होऊन हिंदुत्वादी सरकार निवडून देत आहेत. सर्व ठिकाणी असेच झाले पाहिजे. सर्व आमदार, खासदार, नगरसेवक कट्टर हिंदुत्वादी तयार झाले पाहिजे. संसदेत, विधानसभेत, नगरपालिकेत हे कट्टर हिंदुत्ववादी गेले पाहिजेत. त्यानंतर आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकू. राजकारणाचे हिंदूकरण करणे, हिंदूंची वोटर बँक बनणे, सर्व हिंदुंना छत्रपती शिवाजी महाराज यांचा धर्म ध्वजा खाली एकत्रित आणणे हेच हिंदूंचे आद्य कर्तव्य आहे.
हे सुद्धा वाचा
हिंदू संकटात आहे. कारण हिंदूंना जातीयवादात वाटण्यात येत आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यासारखा वाद निर्माण केला जातो. त्यानंतर प्रांतवाद, भाषावाद केले जाते. खरंतर सर्व हिंदू एकमेकांचे सगे सोयरे आहेत, असे समजल्यावर हिंदू एकत्र येऊ शकतात, असे कालीचरण महाराज यांनी म्हटले.
हे ही वाचा…
‘सर्व हिंदूंनी त्यांची मुंडके छाटली पाहिजे…’, कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य