म्हाकवेत दिवसाढवळ्या घराचे कुलूप काढून सात तोळे दागिने लंपास

2 days ago 1

येथील सिद्राम ज्ञानू पाटील यांच्या घरातील चोरट्यानी फोडलेली तिजोरी Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

20 Nov 2024, 3:46 pm

Updated on

20 Nov 2024, 3:46 pm

म्हाकवे : म्हाकवे ता कागल येथील सिद्राम ज्ञानू पाटील यांच्या बंगल्यातील कुलूप काढून दिवसाढवळ्या साततोळे दागिने व रोख चार हजार रुपये लपास केले त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत कागल पोलिसात तक्रार देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी येथील सिद्राम ज्ञानू पाटील हे व त्यांच्या पत्नी दुपारी एक वाजता मतदान करण्यासाठी प्राथमिक शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराचे कुलूप काढून तिजोरीचे कुलूप फोडून सव्वासात तोळे दागिने लंपास केले. त्‍यांचा हा बंगला हा माळ भागात असून माळवाडी वरील संपूर्ण लोक एकत्रितरित्या मतदानासाठी आले होते. यावरती लक्ष ठेवून दाराबाहेर असणारी किल्ली घेऊन बंगल्याचे कुलूप काढले व तिजोरीत असणारे साततोळे दागिने व रोख ४००० रुपये लंपास केले चोरी केलेल्या दागिन्यामध्ये कोल्हापुरी साज तीन तोळ्याचे मंगळसूत्र दोन चेन यांचा समावेश आहे. माळवाडी वर झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून वारंवार चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते आहे आज निवडणुकीच्या कामात सर्व व्यस्त असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article