‘या’ सरकारी योजनेअंतर्गत शेतकर्‍याला दरमहा मिळणार 3 हजार, असा करा अर्ज

5 hours ago 1

केंद्र सरकार वेळोवेळी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असते. या निमित्ताने केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला दरमहा ५५ रुपये जमा करावे लागतात. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर अर्जदाराला दरमहा ३ हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या गुंतवणुकीच्या योजनेत सरकार ठेवीदारांना त्यांच्या मासिक रकमेएवढी रक्कम जमा करते.

या योजनेची सुरुवात कधी झाली?

पंतप्रधान किसान मानधन ही योजना (PMKMY) १२ सप्टेंबर २०१९ रोजी सुरू करण्यात आली. वृद्धपकाळातील गरीब शेतकऱ्यांना मदत करणे हे हे सरकारचे ध्येय आहे. दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात ठराविक रक्कम येत राहते. कोणताही लहान व अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा ५५ रुपये जमा करावे लागतील. तर पैसे जमा केल्यानंतर सरकार त्यात ५५ रुपये ही जमा करणार आहे. अशा प्रकारे तुमच्या खात्यात दरमहा ११० रुपये जमा होत असतात.

हे सुद्धा वाचा

कोणाला मिळणार लाभ?

गाडी ड्राइव्हर

रिक्षा चालक

चांभार

शिंपी

मजूर

घरकाम करणारे कामगार

भट्टी कामगार

वरील सर्व लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

लाभार्थीच्या मृत्यूनंतर पैसे वाया जातील का?

लाभार्थीच्या मृत्यूनंतर पैसे वाया जात नाही. तर लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी या योजनेत योगदान देऊन पेन्शनचा लाभ घेऊ शकते. लाभार्थीच्या पत्नीला ही योजना सुरू ठेवायची नसेल तर ती रक्कम व्याजासह तिला परत केली जाते.

दरमहिन्याला किती पैसे जमा करावे लागतील?

जर तुमचे वय १८ वर्षे असेल तर तुम्हाला दरमहा ५५ रुपये जमा करावे लागतील.

२९ वर्षे वयोगटातील उमेदवारांना दरमहा १०० रुपये जमा करावे लागतील.

जर तुमचे वय ४० वर्षे असेल तर तुम्हाला दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील.

टीप : तुम्ही दरमहिन्याला जेवढी रक्कम जमा कराल, तेवढीच रक्कम सरकार तुमच्या पेन्शन खात्यात जमा करेल, हे लक्षात ठेवा.

कोणती कागदपत्रे लागतील?

आधार कार्ड

ओळखपत्र

बँक खाते पासबुक

पत्रव्यवहाराचा पत्ता

मोबाइल नंबर

पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

योजनेसाठी पात्रता

असंघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही मजूर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो.

अर्जदाराचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षादरम्यान असावे.

अर्जदार आयकर दाता किंवा करदाता नसावा.

अर्जदाराला ईपीएफओ, एनपीएस आणि ईएसआयसीअंतर्गत समाविष्ट केले जाऊ नये.

मोबाइल फोन, आधार क्रमांक आणि बचत खाते असणे बंधनकारक आहे.

मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी maandhan.in या अधिकृत संकेतस्थळावर लिंक ओपन करा.

लिंक ओपन झाल्यावर पेजवर असलेल्या सेल्फ एनरोलमेंटवर क्लिक करा.

यात आता तुमचा मोबाइल क्रमांक टाकून नंबरवर आलेल्या ओटीपीद्वारे नोंदणी करा.

यानंतर ऑनलाइन फॉर्ममध्ये मागितलेले संपूर्ण तपशील भरून फॉर्म सबमिट करा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article