युवकांनो, स्वत:च्या प्रगतीतून देशाचे उज्ज्वल भविष्य घडवा:रा.ल.तो.मध्ये माजी खासदार पूनम महाजन यांनी युवकांशी साधला संवाद

2 hours ago 1
देशात युवकांना प्रगतीसाठी सुवर्ण संधी आहेत. त्याचे सोने करा. स्वयंरोजगारासह रोजगार देणारेही व्हा. लोकशाही प्रदान भारत देशाकडून विश्वाच्या अपेक्षा आहे. सर्वांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. हीच ती वेळ आहे, जेव्हा देशासाठी काहीतरी करता येणार आहे. तुमच्या प्रगतीमधूनच भविष्यातील उज्ज्वल भारताचे चित्र रेखाटले जाणार आहे, असे संबोधन माजी खासदार पूनम महाजन यांनी केले. राष्ट्रीय विचार मंच, श्री शिवशंभू विचार मंच व बेरार एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त सहकार्याने आयोजित "युवा संवाद' कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी आर. एल. टी. कॉलेज सभागृहात केले . यावेळी पूनम महाजन यांनी "भविष्यातील भारत व युवकांची भूमिका' या विषयांतर्गत, "विकसित भारत २०४७' या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. या वेळी अध्यक्षस्थानी अॅड. मोतिसिंह मोहता होते. मंचावर राष्ट्रीय विचार मंचचे संयोजक खेमराज भटकर, प्राचार्य डॉ. विजय नानोटी होते. पूनम महाजन म्हणाल्या, स्वातंत्र्याची शंभरी गाठताना स्वर्णिम विकासही साधायचा आहे. युवकांनी सॉफ्टस्क्रिलवर काम करण्याची गरज आहे. स्वप्नांचे ट्यूनिंग करा, इतिहास घडवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी देशमुख, तर नीलेश जोशी यांनी आभार मानले. राजकारणातील चुकातून शिकले आयुष्यात चूका करण्यात घाबरू नका. चुकांतून शिकून पुढे जा. मी राजकारणातही काही वेळा चूका केल्या. पहिली निवडणूक हरले होते. आयुष्यात शिकण्याची जिद्द कायम ठेवा. हिच जिद्द तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जाईल, असे या वेळी पूनम महाजन म्हणाल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article