रयत शिक्षण संस्थेत पात्र शिक्षक उमेदवारांना त्वरित नियुक्त्या द्या:मागणीसाठी पुण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू

2 hours ago 2
पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सात महिने उलटले तरी अद्याप नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. राज्यभरातील वंचित उमेदवारांना लवकरात लवकर आस्थापना बदलून नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे आंदोलन शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी आंदोलनाला विरोध केला असून अटक करण्याचा दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी शिक्षक उमेदवारांना अटक केल्यास जेलमध्ये हे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा फोंडे यांनी यावेळी दिला. पहिल्या टप्प्यातील विना मुलाखत निवड यादीतील उमेदवार नियुक्तीपासून वंचित आहेत. गुणवत्ता धारकांना नियुक्ती द्या. नसेल शक्य संस्थेत तर समायोजन करून स्थानिक स्वराज्य संस्थेत नियुक्ती देण्यात यावी. सरकारने पवित्र पोर्टल 2022 मार्फत रयत शिक्षण संस्थेसाठी शिफारस पात्र केलेल्या पण सात महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित असलेल्या एकूण 801 उमेदवारांना तात्काळ आस्थापना बदलून नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत. नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळेपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार मानधन मिळावे. निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते नियुक्ती मिळेपर्यंत जेवढा कालावधी लागेल तेवढ़ा कालावधी शिक्षण सेवक कालावधीमधून कमी करण्यात यावा. आणि वर्षानुवर्षे शिक्षक भरतीत पडलेला खंड आणि वयोमर्यादाचां सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षण सेवक रद्द करावे, आदी मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article