बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणारा आरोपी अक्षय शिंदे याचे वय केवळ 24 वर्षे आहे. त्याचे तीन वेळा लग्न झाले होते. मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती देखील समोर आली होती. अक्षयवर दोन मुलींवर लैंगिक छळ केल्याचा आरोप होता.
बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पोलिसांची बंदूक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक पोलीस अधिकारी ही जखमी झाले आहे. अक्षय शिंदे हा गंभीर असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. सध्या पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. तळोजा कारागृहातून पोलीस त्याला बदलापूरला घेऊन येत असताना ही घटना घडल्याचं बोललं जातं आहे.