Dhangar Samaj: धनगर समाजाला आदिवासीमध्ये समावेशास मूळ आदिवासींचा विरोध

2 hours ago 1

लातूर (Dhangar Samaj) : सध्या महाराष्ट्रभर धनगरांचा समावेश आदिवासीमध्ये करण्यासाठी व्यापक आंदोलन सुरु आहे. (Dhangar Samaj) धनगर समाजाच्या ह्या मागणीस मूळ आदिवासींनी विरोध दर्शविला असून तसे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लातूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारतीय राष्ट्रीय आदिवासी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामराजे आत्राम यांनी सोमवारी (दि.23) दिले. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सध्या (Dhangar Samaj) धनगर समाजास अनुसूचित जमाती (एसटी) त समावेश करण्यासाठी धनगर समाजाची मागणी आहे व ते त्यांच्या या मागणीसाठी आंदोलने करीत दबाव गट निर्माण करीत आहेत.

आदिवासी समाज हा जंगल, दऱ्या-खोऱ्यात राहणारा असून त्यांची संस्कृती वेगळी आहे. त्याच्या चाली, रिती-रूढी, प्रथा, परंपरा ह्या हिंदू धर्मपेक्षा विभिन्न आहेत. आदिवासी हा हिंदू नाही, त्यांची स्वतंत्र आदिवासी संस्कृती आहे. त्यांच्या देव-देवता या हिंदू धर्मापेक्षा निराळ्या आहेत. (Dhangar Samaj) धनगर समाज हा कोणत्याही प्रकारातून आमच्या संवर्गात / प्रवर्गात येऊ शकत नाही. धनगर हा मूळात हिंदू आहे, आम्ही आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी आहोत.

धनगरांची संस्कृती आणि आमची संस्कृती यामध्ये कुठलेही साम्य नाही. तेव्हा आपणास विनंती करण्यात येते की, (Dhangar Samaj) धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आदिवासी (एसटी) प्रवर्गात समावेश करु नये. समावेशास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे. असे झाल्यास आम्हाला आंदोलन उभे करून शासनाच्या विरोधात रस्त्यावर यावे लागेल. यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात आत्राम यांनी दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article