Akshay Shinde : पोलिसांवर प्रश्न उपस्थित करणं दुर्दैवी; CM एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

2 hours ago 1

Akshay Shinde Encounter : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. बदलापुरातील एका शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. बदलापूरकरांनी या घटनेच्या निषेधार्थ रेल्वे रोकली होती. याशिवाय कडकडीत बंद पाळला होता. या आरोपीला फाशी देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात विरोधकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘बदलापूर प्रकरणातील आरोपीवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहातून घेऊन येत असताना ही घटना घडली आहे. या दरम्यान त्याने पोलिसांवर गोळी झाडली. यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. एपीआय मोरे यांच्यावर आरोपीने फायरिंग केली. पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आली आहे. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला. आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या. आता विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदणीय आहे.

‘विरोधी पक्षाला विरोधात बोलायचा काहीही अधिकार आहे. पोलीस जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याच्याबाबत विरोधकांना काहीही वाटत नाही का. जे पोलीस कायदा सुव्यस्था राखण्यासाठी काम करतात. उन्हात पावसात थंडी वाऱ्यात काम करतात. त्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अशा वेळी विरोधकांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. या प्रकरणात चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बहीण योजनेनेने ते बिथरले आहेत. त्यामुळे ते उलटसुलट आरोप करत आहेत.’

विरोधीपक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. वास्तव सगळ्यांसमोर आलं पाहिजे. असं ते म्हणाले. तर त्याने गोळी मारली हे इतक सहज आहे का याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

वर्षा गायकवाड यांचा आरोप

स्वसंरक्षण की हत्या?

एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल?… pic.twitter.com/IF1MVmwJlw

— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 23, 2024

जितेंद्र आव्हाड यांची टीका

आरोपीला न्यायालयाच्या दारात नेऊन त्याचा Encounter घडवून आणणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे..!

संपूर्ण घटनेची तपशीलवार माहिती घेऊन त्या अनुषंगाने गुन्हेगारांना शिक्षा व पीडितांना न्याय देण्यासाठी म्हणून न्यायपालिका भूमिका बजावत असते. पण याउलट युपी-बिहारची एन्काऊंटर संस्कृती…

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 23, 2024

सचिन सावंत यांची प्रतिक्रिया

अक्षय शिंदे या नराधमाच्या झालेल्या तथाकथित एन्काऊंटर मधून किंवा तथाकथित आत्महत्येतून गृह विभागाची लक्तरे लोंबताना दिसत आहेत आणि त्या लक्तरांवर गृहमंत्री लोंबकळत आहेत हीच भावना आहे. या नराधमाला पोलिस घेऊन जात असताना त्याच्या हातात बंदूक जाते कशी? या ढिसाळपणाची , बेफामपणाची…

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 23, 2024

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article