WTC Points Table मध्ये फेरबदल, श्रीलंकेची मोठी झेप, न्यूझीलंडला झटका, टीम इंडियाचं काय?

2 hours ago 1

श्रीलंका क्रिकेट टीमने इंग्लंड दौऱ्यानंतर विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. श्रीलंकेने इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात विजय मिळवला. श्रीलंकेने 10 वर्षांनी इंग्लंडमध्ये विजय मिळवला. त्यानंतर श्रीलंकेने मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यात 63 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने या विजयासह 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 श्रीलंकेला या सलग दुसऱ्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या स्पर्धेतील पॉइंट्स टेबलमध्ये चांगलाच फायदा झाला आहे .तर न्यूझीलंडला पराभवामुळे नुकसान झालं आहे.

न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्याआधी डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी होती. मात्र आता त्यात फेरबदल झाले आहेत. श्रीलंकेला विजयामुळे फायदा झाला आहे. श्रीलंकेने 8 पैकी 4 सामने जिंकलेत तितकेच गमावलेत. श्रीलंकेच्या खात्यात 48 पॉइंट्स आहेत. एका विजयासाठी 12 पॉइंट्स मिळतात. श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही 50 इतकी आहे. श्रीलंका अशाप्रकारे चौथ्यावरुन तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. तर न्यूझीलंडची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडने 7 पैकी 3 सामने जिंकलेत तर 4 गमावलेत. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी ही 42.86 इतकी आहे.

टीम इंडिया नंबर 1

डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी कोणताही बदल झालेला नाही. टीम इंडिया पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. भारताने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. एक सामना हा अनिर्णित राहिला आहे. भारताची विजयी टक्केवारी ही 71.67 टक्के आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात या डब्ल्यूटीसी साखळीत 12 सामन्यांनंतर 90 पॉइंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 62.50 अशी आहे.

श्रीलंकेची तिसऱ्या स्थानी झेप

Back-to-back Test wins for Sri Lanka sees them soar to the 3rd spot connected the #WTC25 Standings 😎

More ➡️ https://t.co/nGxfWhYL3j pic.twitter.com/8JpYtSqHCA

— ICC (@ICC) September 23, 2024

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज,  कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा आणि असिथा फर्नांडो.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साउथी (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article