Adarsh ​​Teacher Samiti: राज्य आदर्श शिक्षक समितीचे आदर्श पुरस्कार जाहीर

2 hours ago 1

लातूर (Adarsh ​​Teacher Samiti) : लातूर जिल्हा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार (Adarsh ​​Teacher Samiti) जाहीर करण्यात आले आहेत. समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दावणकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले.

या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि.28) दुपारी 2 वाजता भालचंद्र ब्लड बँक सभागृहात समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे (वाघ) यांच्या अध्यक्षतेखाली लातूरचे खा. शिवाजीराव काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर (घुगे), आ. विक्रम काळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार, प्राध्यापक अर्जुन जाधव, विभागीय शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, प्रसिद्ध उद्योजक अशोक केदासे, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीपराव ढाकणे, राज्य उपाध्यक्ष चंदू अण्णा घोडके यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये दत्तात्रय बेद्रे, सदाशिव अभंगे, अविनाश जाधव, उत्तम शेळके, मोहन नटवे, किरण आवाळे, देविदास मुंढे, ज्ञानोबा कार्ले, अंकुश लोहकरे गणेश बेल्लाळे उत्तम घोडके रमेश भालेराव अशोक पवार धनराज स्वामी मधुकर धुळे शशिकांत नाबदे या सहशिक्षक व मुख्याध्यापकांचा समावेश आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीमती गिरीजा लोंढे, अनिता पाटील, जगदेवी खानापुरे, साधना बडवणे, जयश्री कुमदाळे, सुचिता बापूरे, कांता सोमवंशी, गंगासागर मुसळे, रोहिणी ढाकणे, किरण पाटील, जयश्री चोले, वंदना बोडखे, अश्विनी बिरादार, शकुंतला कदम यांंचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिता खडके, डॉ. स्मिता विजय मामीलवाड तर कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल संबंधित मुख्याध्यापकांचा (Adarsh ​​Teacher Samiti) सत्कार करण्यात येणार आहे.

दावणकर, मुंढे यांचा सन्मान

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे (Adarsh ​​Teacher Samiti) जिल्हाध्यक्ष लक्ष्मण ज्ञानोबा दावणकर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार, श्री. ज्ञानोबा व्यंकटराव मुंढे साधन व्यक्ती गट साधन केंद्र उदगीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न अवार्ड देऊन सन्मान करण्यात येणार आहे, असे आदर्श पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. बालाजी संमुखराव यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article