राजकीय पक्षाचे बॅनर, झेंडे 24 तासांच्या आत काढा:मोहोळ विधानसभा निवडणुकीचा आढावा, मतदारसंघातील 144 गावात 336 मतदान केंद्रे

1 day ago 1
मोहोळ विधानसभा मतदार संघातील शासकीय कर्मचारी, सर्व पक्षातील पदाधिकारी यांनी शासकीय कार्यालयावरील २४ तास, निमशासकीय ४८ तास, खाजगी जागेतील ७२ तासाच्या आत राजकीय पक्षाचे झेंडे,बॅनर काढून घेऊन आदर्श संहितेचे पालन करा. मोहोळ मतदार संघातील १४२ गावांसाठी ३३६ मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. यात मोहोळ तालुक्यात २३५, उत्तर सोलापूर तालुक्यात ६०, पंढरपूर तालुक्यात ४१ मतदार केंद्राचा समावेश असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी सांगितले. मोहोळ तहसील कार्यालय येथे बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक, नायब तहसीलदार अनिल शहापुरे, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता नियमाची माहिती, राजकीय बॅनर, पोस्टर, दरम्यान घ्यावयाची दक्षता या संदर्भ मध्ये निर्णय निवडणूक अधिकारी सीमा होळकर यांनी मोहोळ तहसील कार्यालय येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. निवडणूक दरम्यान ५० हजार रुपया पर्यंत रोख रक्कम बाळता येईल. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ दोन ठिकाणी वाहने चेक करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान सभा परमिशन घेऊनच घ्याव्यात. निवडणुकीदरम्यान नियमबाह्य काहीच करू नका अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. तहसील कार्यालय येथे निवडणूक आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. काही अडचण निर्माण झाल्यास संपर्क करा, असे निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी सांगितले. निवडणुकीसाठी २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक निर्णय अधिकारी १, सहाय्यक निवडणूक अधिकारी-३, पोलीस निरीक्षक अधिकारी-४, नायब तहसिलदार-२ , नगरपालिका मुख्याधिकारी-२ , झोनल अधिकारी-३५, नोडल अधिकारी-१८, साधारण कर्मचारी २५० नेमणूक करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article