युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजFile Photo
Published on
:
06 Feb 2025, 5:34 pm
Updated on
:
06 Feb 2025, 5:34 pm
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी होणार आहे. या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात आणि शिवाजी महाराजांच्या जयघोषात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन दुमदुमणार आहे. यावेळी ‘द फोक आख्यान’ (उत्सव मराठी लोककलेचा) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होत असून मेजर जनरल एस. एस. पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे होणाऱ्या दिल्लीतील शिवजयंती सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे मराठी संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना घडविण्यात येईल. नाशिकच्या शिवराय ढोल पथकातर्फे नविन महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात येईल. पोवाडे, शाहीरी, तुतारी वादन, लेझीम इत्यादी मराठमोळ्या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.