Vidhansabha Election 2024 Women Voting Percentage : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होत आहे. काल राज्यभरात मतदान झालं. काल 65.02 टक्के झालं. यात महिला मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. महिला मतदारांचं मतदान कोणाच्या बाजूने झुकणार? वाचा सविस्तर बातमी...
mahavikas aaghadi and mahayuti
महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. काल मतदान झालं आहे. शनिवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात 65. 02 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. हा वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या बाजूने मतदान करणार? यावर सत्तास्थापनेचं गणित अवलंबून असणार आहे. महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर यंदा मतदान केलं आहे. त्यामुळे महिलांची मतं कुणाच्या पारड्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
पुणे जिल्ह्यात मतदानात वाढ
पुण्यात यंदा मतदानाच्या टक्केवारी वाढ झाली आहे. वाढलेल्या मतांचा लाभ कुणाला होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुणे जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांत सरासरी ६९ टक्के मतदान झालं आहे. तर शहरी भागातील ८ मतदारसंघांत ५४ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा सहा टक्के मतदान शहरात वाढले आहेत. सर्वाधिक ७६.९३ टक्के मतदान इंदापूर तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल बारामती आणि मावळ मतदारसंघात ७२ टक्के मतदान झाले आहे.